लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी असल्याने भाजपा कार्यकर्ते- पदाधिकाºयांना बळ देण्याऐवजी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून इतर पक्षातील नेत्यांना अधिक महत्त्व देण्यात येत असल्याने स्थानिक पदाधिकाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.परभणी जिल्ह्यात भाजपाची फारसी ताकद नाही. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने सत्तेचा उपयोग करुन पक्षाची ताकद जिल्ह्यात वाढविण्याचा प्रयत्न होईल, असे गेल्या चार वर्षापासून पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना वाटत होते; परंतु, तशी कुठलीही बाब होताना दिसून येत नसल्याने हे कार्यकर्ते चलबिचल झाले आहेत.जिल्हास्तरावर पक्षीय संघटन मजबूत करुन सर्वांना एकत्र आणण्याची कसब पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये नसल्याच्या कारणावरून जालना जिल्ह्यातील परतूरचे आमदार तथा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर परभणी जिल्ह्याच्या संपर्कमंत्र्यांची पक्षाने जबाबदारी दिली. त्यामुळे पक्षाला जिल्ह्यात ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार पक्षवाढीच्या अनुषंगाने लोणीकर यांच्याकडून कार्यक्रम हाती घेतला जाईल, अशी चर्चाही होती; परंतु, तशी कोणतीही बाब होताना दिसून येत नाही. दीड वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला जिल्ह्यात यश मिळाले नाही. त्यानंतर झालेल्या परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे ८ सदस्य निवडून आले असले तरी या आठही सदस्यांची भूमिका पक्षाला संभ्रमित करणारी होती.कॉंग्रेसच्या महापौरांच्या निवडीत सर्वप्रथम भाजपाच्याच नगरसेवकांनी समर्थन दिले होते. हा विषय राज्यस्तरावर चर्चिला गेला होता. परभणी पंचायत समितीत भाजपाने कॉंग्रेसला समर्थन दिले तर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला समर्थन दिले. त्यामुळे भाजपाची नेमकी भूमिका काय? हेच पक्षातील कार्यकर्त्यांना कळत नाही. या घडामोडीत लोणीकरांची भूमिकाही फारसी निर्णायक नव्हती. आता जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन बराच कालावधी लोटला. लोकसभा निवडणुकीचे वेध सर्वत्र लागले आहेत. भाजपाकडूनही वेळ पडलीच तर स्वबळावर लढण्याच्या अनुषंगाने तयारी केली जात आहे. पक्षाने उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर दोन-तीन वेळा कार्यकर्त्यांच्या बुथनिहाय आढावा बैठका झाल्या. असे असले तरी नवीन शाखा स्थापनेसंदर्भात कुठलाही कार्यक्रम झाला नाही. जिल्हास्तरावर पक्षातील स्थानिक पदाधिकाºयांना सोबत घेऊन पक्षवाढीच्या अनुषंगाने चर्चाही झाली नाही. आता गेल्या काही दिवसांपासून लोणीकर यांच्याकडून स्वपक्षीय पदाधिकाºयांपेक्षा इतर पक्षातील नेत्यांना महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे तालुकास्तरीय नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: सेलू, जिंतूर, गंगाखेड, पालम आदी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाºयांनी पक्षश्रेष्ठींकडेच याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विशेषत: जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघात स्थानिक पदाधिकाºयांना डावलल्याची भूमिका पक्षाच्या स्यानिक नेत्यांना रुचलेली नाही. अनेक वर्षांपासून सत्ता नसतानाही पक्षाचे काम केले. आता कुठे पक्षाची सत्ता आली आणि वरिष्ठ मात्र स्व:पक्षियांना सापत्न वागणूक देत इतर पक्षांच्या नेत्यांना महत्त्व देत आहेत, हे सहन कसे करायचे, असा सवाल या स्थानिक पदाधिकाºयांकडून उपस्थित केला जात आहे.उद्या निवडणूक आल्यानंतर ज्यांच्या विरोधात प्रचार करायचा, त्याच नेतेमंडळींसोबत आपल्याच पक्षाचे मंत्री वावरत असतील तर जनतेमध्ये संदेश काय जाईल आणि निवडणुकीत त्यांच्याच विरोधात काय बोलायचे, असा सवाल या पदाधिकाºयांकडून उपस्थित केला जात आहे.
परभणी : लोणीकरांच्या भूमिकेमुळे स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांत अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:06 AM