पाथरी पोलिसांनी 10 लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 01:32 PM2020-11-10T13:32:50+5:302020-11-10T13:33:52+5:30
मंगळवारी पहाटे पोलिसांची पेट्रोलिंग करत असताना कारवाई
पाथरी : गस्तीवर असलेल्या पाथरी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने शहरातील रेणुका साखर कारखाना परिसरात एका टेम्पोतून तब्बल 10 लाख 80 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई 10 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.
पाथरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी धनंजय शिंदे, अमोल मुंढे, होम गार्ड कृष्णा नागरजोगे यांचे पथक शहरात रात्री गस्तीवर होते. पथकाला मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास पाथरी - सेलू रस्त्यावर रेणुका साखर कारखाना परिसरात एक टेम्पो उभा असल्याचे दिसले. टेम्पोतून गुटख्याचा वास येत असल्याने पथकाने अधिक तपासणी केली. यावेळी टेम्पोतील 30 गोण्यात गुटखा मिळून आला. याची किंमत 10 लाख 80 हजार इतकी आहे. या
प्रकरणी पोलिसांनी बंगलोर येथील यासीन खान गौस खान ( रा आंदणअप्पा तालुका मटाडहली ) यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जी. डी. सौंदने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी पोहे धनंजय शिंदे यांच्या फिर्यदिवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पाथरी शहरात खुलेआम गुटखा विक्री होतो. शहरातील अनेक पानपट्टीवर सहज गुटखा मिळत असल्याचे चित्र आहे.