बंधारा फोडून पाणी सोडणाऱ्याचा शोध लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:28 AM2021-05-05T04:28:03+5:302021-05-05T04:28:03+5:30
धारखेड व गंगाखेड शहरादरम्यान गोदावरी नदी पात्रात पुलाचे काम सुरू आहे. याठिकाणी मातीचा कच्चा बंधारा उभारण्यात आला आहे. या ...
धारखेड व गंगाखेड शहरादरम्यान गोदावरी नदी पात्रात पुलाचे काम सुरू आहे. याठिकाणी मातीचा कच्चा बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्यात गंगाखेड शहरासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. मात्र, हे पाणी बंधाऱ्याच्या खालील गावातील सिंचनासाठी व पाणी पुरवठ्यासाठी सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. या मागणीवर प्रशासनाची बैठक होऊन तोडगा काढण्यात आला होता. मात्र, ३० एप्रिल रोजी अज्ञातांनी पोकलेनच्या साह्याने मातीचा कच्चा बंधारा फोडून पाणीसाठा सोडून देण्यात आला. परिणामी गंगाखेड शहरावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे या अज्ञाताचा शोध घेणे आवश्यक होते. परंतु, चार दिवस उलटले तरीही पाणी सोडून देणाऱ्याचा अद्याप शोध लागला नसल्याने शहरवासियांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.