मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात झाल्यापासून पोलीस अधिकारी, कर्मचारी फ्रंटलाईनवर काम करत आहेत. जिल्ह्यात सध्या दररोज ५०० ते १००० रुग्ण बाधित होत आहेत. या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लावली आहे. मागील वर्षीपासून लोकांसाठी सतत घराबाहेर बंदोबस्त आणि कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. यातून अनेक पोलीस बरे झाले तर काहींना आपला जीव गमवावा लागला. या सर्व स्थितीमुळे पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबात सध्या भीतीदायक वातावरण आहे.
२९६ कर्मचारी, २२ अधिकारी पाॅझिटिव्ह जिल्हा पोलीस दलात एकूण १,८५८ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी आतापर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील पोलीस स्टेशन व अन्य विभागातील कर्मचारी बाधित झाले आहेत. यात २२ पोलीस अधिकारी, २९६ कर्मचारी आतापर्यंत बाधित आढळले आहेत. यातील १५० जण कोरोनामुक्त झाले तर १३९ जणांवर उपचार सुरू आहेत.
लसीकरणाची माहिती
पहिला डोस घेणारे - १,६८५
दुसरा डोस घेणारे - १,३२६
अद्याप लस न घेतलेले - १६५
सात जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील सात पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.
३,६२७ जणांची चाचणी
पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी आतापर्यंत करण्यात आली. यामध्ये ३,६२७ जणांची तपासणी करण्यात आली.
बाबा, आम्ही घरी वाट बघतोय
आधीच बाबांची आणि आमची जास्त वेळ भेट होत नाही. मागील एक वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यातच संचारबंदीने आम्ही घरी मात्र, बाबांना नेहमीच बंदोबस्तामुळे बाहेर राहावे लागते. कोरोनाची भीती वाटत असल्याने त्यांनी घरी राहावे, असे वाटते.
- सार्थक सुग्रीव केंद्रे
आधीच कामामुळे बाबा वेळेवर घरी न येत नाहीत. एरव्ही एकाच ठिकाणी कार्यालयात किंवा शहरात कामासाठी ते जात होते. आत कोरोनाच्या स्थितीत जिल्ह्यात जावे लागते, त्यामुळे अजूनच भीती वाटते.
- नयन नीलेश भुजबळ