प्रधानमंत्री पीकविमा योजना : परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षताच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 07:56 PM2020-01-20T19:56:21+5:302020-01-20T19:58:53+5:30

१२ मंडळांतील ४९ हजार ४८३ शेतकऱ्यांनाच तुटपुंजी मदत 

Pradhan Mantri Peakvima Yojana: Millions of farmers in Parbhani district have the power to share! | प्रधानमंत्री पीकविमा योजना : परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षताच !

प्रधानमंत्री पीकविमा योजना : परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षताच !

Next
ठळक मुद्देसोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा

- मारोती जुंबडे 
परभणी : आॅक्टोबर २०१९ मध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्णत: नुकसान झाले होते़ नुकसान झाल्याचे राज्यपाल व राज्य शासनाने मान्यही केले़ त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना मदतीचे वाटपही करण्यात आले; परंतु, अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने जिल्ह्यातील ३८ महसूल मंडळांपैकी केवळ १२ महसूल मंडळातील ४९ हजार ४८३ शेतकऱ्यांना ९ कोटी ६३ लाख ८७ हजार ४७८ रुपयांचाच पीक विमा दिला आहे़ त्यामुळे २६ मंडळांतील शेतकऱ्यांना विमा कंपनीने ठेंगा दाखविल्याचे समोर आले आहे़ 

२०१९-२० या खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या प्रमुख पिकांचा पेरा केला होता़ नैसर्गिक संकटांच्या कचाट्यातून आपल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ८ लाख २१ हजार ६८७ शेतकऱ्यांनी ४ लाख ३० हजार ४३५ हेक्टर क्षेत्रावरील उडीद, कापूस, मूग, धान, बाजरी, ज्वारी, भात व सूर्यफूल पिकांचा विमा अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे उतरविला होता़ यामध्ये ७२ हजार ९९८ शेतकऱ्यांनी २४ हजार ६२७ हेक्टर क्षेत्रावरील उडीद पिकासाठी विमा कंपनीकडे ९३ लाख ५८ हजार ३४८ रुपयांचा विमा हप्त्याची रक्कम भरली होती़ त्याचबरोबर ७० हजार ५७७ शेतकऱ्यांनी ३१ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकाच्या विम्यापोटी ६ कौटी ८३ लाख ४३ हजार ६७५ रुपयांची विमा रक्कम कंपनीकडे वर्ग केली होती़ १ लाख ८९ हजार १३० शेतकऱ्यांनी ७५ हजार २३ हेक्टर क्षेत्रावरील मूग पिकासाठी २८ कोटी ५० लाख ८ हजार ९९८ रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे वर्ग केला होता़ त्याचबरोबर सर्वाधिक ३ लाख ७ हजार ५०२ शेतकऱ्यांनी २ लाख २७ हजार ४० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकापोटी १९ कोटी ५२ लाख ५४ हजार ५७१ रुपयांचा वाटा कंपनीकडे भरला होता़ आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील पिकांची परिस्थितीही सुस्थितीत होती़; परंतु, आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला व ३८ मंडळातील मूग व उडीद या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले़ शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला़ त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची निंतात गरज असल्याचे पाहून तालुका व जिल्हा प्रशासन कामाला लागले़ जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामे केले़ जिल्ह्यात १०० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविला़ राज्य शासन व राज्यपालांनीही शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ८ हजारांची मदत घोषित केले़ तिचे वाटपही केले़ शासकीय मदत मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी भरलेला अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडील विमा  १०० टक्के मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु, या विमा कंपनीने ३८ मंडळांपैकी केवळ १२ मंडळातील हजार ४९ हजार ४८३ शेतकऱ्यांना ९ कोटी ६३ लाख ८७ हजार ८७८ रुपयांचाच विमा मंजूर केला आहे़ त्यामुळे १२ मंडळातील शेतकऱ्यांना यावर्षीही विमा कंपनीने ठेंगाच दाखविल्याचे समोर आले आहे़ 

उडीद पिकासाठीही वगळली १२ मंडळे
२०१९-२० या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७२ हजार ९९८ शेतकऱ्यांनी अ‍ॅग्रीकल्चर इन्श्ुारन्स कंपनीकडे आपल्या उडीद पिकाचा विमा उतरविला होता़ विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती या पिकांतून काहीच लागले नाही़ त्यामुळे १०० टक्के शेतकऱ्यांना हा विमा मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, या विमा कंपनीने ३८ मंडळांपैकी केवळ २२ मंडळातील १५ हजार ९७९ शेतकऱ्यांना २ कोटी ३१ लाख ९५ हजार ५४३ रुपयांचाच पीक विमा मंजूर केला आहे़ त्यामुळे मुगापाठोपाठ उडीद पिकासाठी १२ मंडळातील शेतकऱ्यांना वगळले असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त हाते आहे़ 

या मंडळांतील शेतकरी वंचित
२०१९-२० या खरीप हंगामातील मूग पिकासाठी विमा कंपनीने गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, राणीसावरगाव व गंगाखेड, जिंतूर तालुक्यातील आडगाव, बामणी, मानवत तालुक्यातील केकरजवळा, कोल्हा, पालम तालुक्यातील बनवस, चाटोरी, पालम़ परभणी तालुक्यातील दैठणा, पिंगळी, सिंगणापूऱ पाथरी तालुक्यातील बाभळगाव, हादगाव बु़, पाथरी़ पूर्णा तालुक्यातील चुडावा, कात्नेश्वर, लिमला, पूर्णा व ताडकळस़ सेलू तालुक्यातील देऊळगाव गात, सेलू तर सोनपेठ तालुक्यातील आवलगाव व सोनपेठ या मंडळातील शेतकऱ्यांना मूग पिकाच्या विम्यातून वगळले आहे़उडीद पिकासाठी गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड, महातपुरी, माखणी, राणी सावरगाव, जिंतूर तालुक्यातील आडगाव, बामणी, बोरी, जिंतूर, सावंगी म्हाळसा, पाथरी तालुक्यातील बाभळगाव, हादगाव बु़, पाथरी़ पूर्णा तालुक्यातील चुडावा, कात्नेश्वर, लिमला, पूर्णा, ताडकळस़ सेलू तालुक्यातील चिकलठाणा बु़, देऊळगावगात, कुपटा, सेलू, वालूर या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उडीद पिकासाठी  वगळण्यात आले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ 

Web Title: Pradhan Mantri Peakvima Yojana: Millions of farmers in Parbhani district have the power to share!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.