लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हाभरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून सोमवारी सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार सरासरी ८.५८ मि.मी. पाऊस झाला आहे.जिल्ह्यात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मान्सून अद्याप दाखल झाला नसला तरी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस झाला. जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ३४.१७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परभणी तालुक्यामध्ये १०.८८ मि.मी., पालम तालुक्यात १ मि.मी., पूर्णा ०.६० मि.मी., गंगाखेड २ मि.मी., सोनपेठ १ मि.मी., सेलू २२ मि.मी., पाथरी ३ मि.मी., मानवत २.३३ मि.मी. पाऊस झाला आहे.बामणी मंडळात अतिवृष्टीजिंतूर तालुक्यातील बामणी महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या मंडळात तब्बल ७५ मि.मी. पाऊस झाला असून जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा मंडळात ५६ मि.मी., बोरी मंडळात ३५ मि.मी., चारठाणा मंडळात १५ तर आडगाव मंडळात १६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.येलदरीत विजांच्या कडकडाटासह पाऊसयेलदरी- येलदरी परिसरात ३ जून रोजी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दोन तास हा पाऊस झाला. येलदरी धरणाच्या नियंत्रण कक्षाने या पावसाची ५६ मि.मी. नोंद घेतली आहे.सेलूत जोरदार पाऊससेलू- सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास सेलू तालुक्यात वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाºयामुळे सेलू शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता. अर्धा तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सेलू शहरातील सखल भागात पाणी साचले होते. सोमवारी सकाळी शहरातील बहुतांश रस्त्यावर नालीतील पाणी आणि कचरा साचला. पहिल्याच पावसात दाणादाण उडल्याचे दिसून आले. नगरपालिकेने नाल्यांची सफाई न केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले होते.
परभणी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 12:34 AM