परभणीत व्हिडिओ पार्लरवर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:51 AM2019-01-13T00:51:21+5:302019-01-13T00:51:24+5:30
पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या दोन व्हिडिओ पार्लरवर पोलिसांनी १० जानेवारी रोजी रात्री छापा टाकून ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईत दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या दोन व्हिडिओ पार्लरवर पोलिसांनी १० जानेवारी रोजी रात्री छापा टाकून ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईत दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले.
पालम शहरातील न्यू पटेल व्हिडिओ गेम पार्लर आणि शिवानी व्हिडिओ गेम पार्लर या गेम पार्लरवर ही कारवाई करण्यात आली. शहरातील बसस्थानकाच्या परिसरात हे गेम पार्लर सुरु होते. या ठिकाणी जुगार खेळविणाऱ्या महेंद्रपाल देविदास हनवते (रा.पालम) आणि सुभाष मारोतराव सिरस्कर (रा.पालम) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पैशांचे प्रलोभन दाखवून विना परवाना व्हिडिओ गेम क्वाईन मशीनच्या माध्यमातून हा जुगार खेळविला जात होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून रोख रक्कम व व्हिडिओ गेम पार्लरचे साहित्य असा ८० हजार ७९० रुपयांचा ऐवज जप्त केला.
या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सावंत तपास करीत आहेत.
ही कारवाई विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत पांचाळ, हनुमंत कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदीश रेड्डी, दीपक मुंडे, ब्रह्मानंद कोल्हे, नंदा काळे यांनी केली.