परभणीत शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

By मारोती जुंबडे | Published: October 2, 2023 05:33 PM2023-10-02T17:33:49+5:302023-10-02T17:35:03+5:30

या मोर्चाचे रुपांतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सभेत झाले.

Protest march of Parbhanit teachers at Collectorate | परभणीत शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

परभणीत शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

googlenewsNext

परभणी: कॉर्पोरेट कंपन्यांना सरकारी शाळा दत्तक न देणे, समूह शाळा न करणे, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक समन्वय महासंघाने जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालायाच्या मैदानावरुन आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाचे रुपांतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सभेत झाले. या मोर्चात शिक्षिकांचा लक्षणीय सहभाग होता.

सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे, कॉर्पोरेट कंपन्यांना सरकारी शाळा दत्तक न देणे, समूह शाळा न करणे, लोकप्रतिनिधी कडून शिक्षकांविषयी अवमानकारक वक्तव्य याविषयी मानभंग म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे, बाह्य यंत्रणे मार्फत कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार एजन्सी न नेमणे या बाबीं विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे रुपांतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सभेत झाले. त्यानंतर नायब तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले. या मोर्चात अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, उपाध्यक्ष वसंत डासाळकर, विलासराव कदम, रामराव रोकडे, दिलीप लाड, युवराज अंधारे, मुंजाराम मुंढे, नारायणराव जाधव, सतीश कांबळे, कार्याध्यक्ष कविता पौळ, सोपान बने, राम लोहट, मधुकर कदम, डॉ. दिलीप शृंगार पुतळे, सचिन पैलवाड, शिरीष लोहट, संदीप राहुलवार, सुधीर सोनुनकर, व्यंकटराव जाधव, अमोल निकम आदींचा सहभाग होता.

राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे ही आंदोलन
शाळांचे कंत्राटीकरण बंद करावे, गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थी केंद्रित धोरण ठरविण्यात यावे, शिक्षणावर होणारा खर्च मर्यादित न ठेवता राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार विजय गव्हाणे, संतोष धारासुरकर, डॉ. विवेक नावंदर, सूर्यकांत हाके, बळवंत खळीकर, उदय देशमुख, अनिल तोष्णीवाल, प्रा. तुकाराम साठे, गणेश शिंदे, पंढरीनाथ घुले, प्रल्हाद लाड, संतोष गायकवाड, जे.ए. राखुंडे, आर. आर. जाधव, दिगंबर मोरे, अनिल तोष्णीवाल, डी.बी. अंभोरे, बी. एम. भांगे, आर. एम. चव्हाण, यशवंत मकरंद आदींचा समावेश होता.

Web Title: Protest march of Parbhanit teachers at Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.