परभणी : पूर्णा पंचायत समितीच्या लेखा विभागातील लिपिकास शासकीय वाहन चालकाच्या अतिरक्त कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेताना आज सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली.
पंचायत समिती कार्यालयातील शासकीय वाहन चालकाच्या अतिरिक्त कामाचे बिल काढण्यासाठी लेखा विभागातील वरिष्ठ सहायक लिपिक राजेंद्र मुंजाजी कणकुटे यांनी पैशाची मागणी केली. यानुसार वाहन चालकाने त्यांना आज सायंकाळी 1500 रुपये दिले. ते घेऊन जात असताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना नांदेड रस्त्यावर इकबाल नगर येथे लाचेच्या रकमेसह पकडले. या प्रकरणी पूर्णा पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कार्यवाही लाच लुचपत प्रतिबन्धक विभागाचे उपाधीक्षक एन. एन. बेबंडे, पो.नि. विवेकानंद भरती, लक्ष्मण मुरकुटे, अविनाश पवार, अनिल कटारे, सचिन गुरसुडकर, शेख मुखींद, सारिका टेहरे, रमेश चौधरी, जहागीरदार, भालचंद्र बोके या पथकाने केली