रबी हंगामातील ज्वारी पीक बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:31 AM2020-12-14T04:31:34+5:302020-12-14T04:31:34+5:30

सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. खरीप ...

Rabi season sorghum crop flourished | रबी हंगामातील ज्वारी पीक बहरले

रबी हंगामातील ज्वारी पीक बहरले

Next

सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांची मदार रबी हंगावर आहे. उशिराच्या पावसाने रबी पीक पेरणीसाठी शेतकऱ्यांना फायदा झाला. सोयाबीन काढणीनंतर सुरुवातीला करण्यात आलेल्या रबी हंगामातील ज्वारी पीक सध्या बहरात आहे. कापूस वेचणीत आवरल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस पीक उपटून ज्वारी, गहू आणि हरभऱ्याची पेरणी केली आहे. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्याबरोबरच जायकवाडीच्या पाण्यावरही रबी हंगामातील पिकांना पाणी दिले जात आहे. तालुक्यात २४ हजार ८३९ हेक्टरवर रबी क्षेत्र आहे. ज्यामध्ये १८ हजार ४२० हेक्टरवर पेरणी होणे अपेेक्षित आहे. आतापर्यंत ७ हजार ८३७ हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. सध्या ज्वारी पीक जोमदार असल्याचे पाथरी तालुक्यात दिसून येत आहे.

Web Title: Rabi season sorghum crop flourished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.