अल्पवयीन मुली लाॅक, बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:24+5:302021-06-30T04:12:24+5:30

सन २०२० दाखल गुन्हे ६६ मुले-मुली ७१ हरवलेली मुले २१ हरवलेल्या मुली ५० मिळालेली मुले २० मिळालेल्या मुली ...

The rate of disappearance of underage girls decreased | अल्पवयीन मुली लाॅक, बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले

अल्पवयीन मुली लाॅक, बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले

Next

सन २०२०

दाखल गुन्हे ६६

मुले-मुली ७१

हरवलेली मुले २१

हरवलेल्या मुली ५०

मिळालेली मुले २०

मिळालेल्या मुली ४५

शोध बाकी ५ मुली, १ मुलगा

सन २०२१ मे पर्यंत

दाखल गुन्हे ३४

मुले-मुली ४०

हरवलेली मुले १३

हरवलेल्या मुली २७

मिळालेली मुले १२

मिळालेल्या मुली २३

शोध बाकी ४ मुली, १ मुलगा

१० टक्के मुलींचा शोध लागेना

गेल्या दीड वर्षात ७७ मुली हरवल्या आहेत. यात २०२० मध्ये ५० मुली हरवल्या यापैकी ४५ सापडल्या आहेत. तर २०२१ मे पर्यंत २७ मुली हरवल्या आहेत. यातील २३ मुली सापडल्या आहेत. सध्या ४ मुलींचा शोध लागणे बाकी आहे. एकूण हरवलेल्या मुलींपैकी १० टक्के मुलींचा शोद लागणे बाकी आहे.

अपहरणाचा दाखल होतो गुन्हा

अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाल्यास यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. यानंतर पोलीस मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करतात. यामध्ये घरातील व्यक्ती, मित्र-मैत्रीण किंवा नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून शोध घेतला जातो. घरातील व्यक्तींची परवानगी असल्यास वर्तमानपत्रातून फोटोसह शोधपत्रिका दिली जाते. यासह जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना ही शोधपत्रिका पाठविली जाते.

मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक

अल्पवयीन मुले आणि मुली यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक गुन्हे हे मुलींचे दाखल होतात. ही बाब दाखल होणाऱ्या गुन्ह्यातून दिसून येते. परभणी पोलीस दलातील पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हा शाखा अशा प्रकरणात विलंब न करता मुला-मुलींचा शोध घेतात, हे सापडलेल्या मुलींच्या आकडेवारीवरून दिसून येते.

Web Title: The rate of disappearance of underage girls decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.