परभणी : जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, गंगाखेड व पालम या चार तालुक्यांतील शासकीय समित्यांवरील शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या अशासकीय सदस्यांची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकार्यांनी केली आहे़ भाजपाच्या वाट्याला आलेल्या समित्यांच्या सदस्यांची निवड मात्र बारगळलेलीच आहे़
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी १६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांना गंगाखेड, पालम, पूर्णा व परभणी या चार तालुक्यांतील शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या १२ समित्यांवरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याची शिफारस केली होतीे. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी अध्यक्ष, सदस्यांची घोषणा केली. त्यामध्ये परभणी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीवर अध्यक्ष म्हणून दगडू काळदाते यांची तर पूर्णा तालुकाध्यक्षपदी मदन अंभोरे, गंगाखेडच्या तालुकाध्यक्षपदी अनिल सातपुते, पालमच्या तालुकाध्यक्षपदी श्रीकांत क-हाळे यांची निवड करण्यात आली आहे़ प्रत्येक ठिकाणी सदस्य म्हणून चौघांची नियुक्ती करण्यात आली आहे़
वीज सल्लागार समितीच्या परभणी तालुकाध्यक्षपदी भास्कर देवडे, पूर्णा तालुकाध्यक्षपदी प्रकाश क-हाळे, गंगाखेड तालुकाध्यक्षपदी रामकिशन शिंदे तर पालम तालुकाध्यक्षपदी सतीश शिंदे यांची निवड करण्यात आली आहे़ रोजगार व स्वयंरोजगार समितीच्या परभणी तालुकाध्यक्षपदी संतोष उत्तमराव बोबडे, गंगाखेड तालुकाध्यक्षपदी दयानंद कुदमुळे, पालम तालुकाध्यक्षपदी अंकुश भातमोडे यांची निवड करण्यात आली आहे़ पुर्णेचे तालुकाध्यक्षपद रिक्त ठेवण्यात आले आहे़ दक्षता पुरवठा समितीच्या परभणी तालुकाध्यक्षपदी अंजली राजेश पवार, पूर्णा तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब घाटूळ, गंगाखेड तालुकाध्यक्षपदी सुनीता घाडगे, पालम तालुकाध्यक्षपदी बालाजी लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्राथमिक शिक्षण सल्लागार समितीच्या परभणी तालुकाध्यक्षपदी मारोती वावरे, पूर्णा तालुकाध्यक्षपदी रोहिणी काळे, गंगाखेड तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब राखे, पालम तालुकाध्यक्षपदी गजानन पवार यांची निवड करण्यात आली आहे़ या समितीवर इतर दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़
वसतिगृह निरीक्षण समितीच्या परभणी तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर गिरी, पालम तालुकाध्यक्षपदी एकनाथ मोहिते, गंगाखेड तालुकाध्यक्षपदी महेश साळापुरीकर, पूर्णा तालुकाध्यक्षपदी नितीन कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ ग्रामीण रुग्णालय समितीच्या पूर्णा तालुकाध्यक्षपदी प्रभाकर चापके, पालम तालुकाध्यक्षपदी सदाशिव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ गंगोखड व परभणीचे पद रिक्त आहे़ सुवर्ण जयंती ग्रामस्वयंरोजगार योजना अंमलबजावणी समितीच्या पूर्णा तालुकाध्यक्षपदी श्याम कदम, पालम तालुकाध्यक्षपदी बाळू कदम, परभणी तालुकाध्यक्षपदी गंगाधर मोरे यांची निवड करण्यात आली आहे़ रोहयो समितीच्या गंगाखेड तालुकाध्यक्षपदी विष्णू मुरकुटे, पालम तालुकाध्यक्षपदी हनुमंत पौळ, परभणी तालुकाध्यक्षपदी गोपीनाथ झाडे, पूर्णा तालुकाध्यक्षपदी दशरथ भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य परिवहन सल्लागार समितीच्या पूर्णा तालुकाध्यक्षपदी हिराजी भोसले, पालम तालुकाध्यक्षपदी बब्रुवान क-हाळे, परभणी तालुकाध्यक्षपदी सुरेश जंपनगिरे, गंगाखेड तालुकाध्यक्षपदी मोहन कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे़ नगरपालिका दक्षता समितीच्या पूर्णा तालुकाध्यक्षपदी विजय कदम, गंगाखेड तालुकाध्यक्षपदी नागेश कोनार्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ भ्रष्टाचार निर्मूलन समितीवरही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तीन सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत़ या संदर्भातील माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली़
भाजपाच्या जागा रिक्तजिल्ह्यात शिवसेनेकडे पालकमंत्रीपद असल्याने शासकीय समित्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांमध्ये या पक्षाकडे ६० टक्के जागांचा वाटा आहे़ गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असलेल्या या समित्यांवरील चार तालुक्यांतील सदस्यांची पालकमंत्र्यांनी निवड केली़ उर्वरित तालुक्यातील सदस्यांची निवडही निश्चित झाली असल्याचे समजते़ भाजपाच्या वाट्याला आलेल्या ४० टक्के जागांवरील नावांची शिफारस पालकमंत्र्यांकडे या पक्षाच्या नेत्यांनी केली नाही़ त्यामुळे या पक्षाच्या वाट्याला आलेल्या जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले़