लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर १६ एप्रिल रोजी खा़ बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला़ या मोर्चात मतदार संघातील शिवसैनिकांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़मतदार संघातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करावा, गारपिटीचे व बोंडअळीचे अनुदान त्वरित द्यावे, मूग, उडीद, तीळ, तूर या पिकांना शंभर टक्के विमा द्यावा, पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करू नये, शेतकºयांची कुचेष्टा करणाºया खाजगी पीक विमा कंपनीकडील पीक विमा योजना रद्द करावी, विमा कंपनीविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला़सोमवारी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास खा़बंडू जाधव यांच्या नेतृत्वखाली भगवती चौक येथून मोर्चाला प्रारंभ झाला़ सरकारविरोधी घोषणा देत शहरातील मुख्य रस्त्याने हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला़ संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोरील प्रांगणावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले़ यावेळी शिवसेनेचे गंगाखेड विधानसभाप्रमुख संतोष मुरकुटे यांनी प्रास्ताविक केले़ भाजप सरकारने प्रत्येक गोष्टीत शेतकºयांवर अन्याय केला़ हे सरकार केवळ घोषणा देत असून, अंमलबजावणी करीत नाही़ गंगाखेड मतदार संघातील लोकप्रतिनिधी व इतर पक्षातील पुढारी निधी आणण्याच्या कारणावरून आपसात वाद घालत आहेत़ लोकप्रतिनिधी व नेत्यांना शेतकºयांच्या प्रश्नांशी देणे-घेणे नाही, असा आरोप मुरकुटे यांनी केला़ त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे, तहसीलदार जीवराज डापकर यांना निवेदन देण्यात आले़ या प्रसंगी जिल्हाप्रमुख विशाल कदम, उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, महिला आघाडीच्या सखुबाई लटपटे, अर्जुन सामाले, तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे, हनुमंत पौळ, काशीनाथ काळबांडे, अॅड़ महेश साळापुरीकर, बालासाहेब निरस, गजानन पवार, नितीन कदम, संजय सारणीकर, बाळासाहेब राखे, संदीप वाळके, अमोल दिवाण, नागेश कोनार्डे, अनिल सातपुते, संदीप राठोड, जानकीराम पवार, माधव शेंडगे आदींसह शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़खाजगी कंपन्यांसाठी शेतकºयांचा बळी घेतला-जाधवखाजगी कंपन्या जगविण्यासाठी हे सरकार शेतकºयांचे बळी घेत आहे़, असा आरोप खा़बंडू जाधव यांनी यावेळी केला़ दुष्काळामुळे संकटात असलेल्या शेतकºयांसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेतल्यानेच सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली़ मात्र ही घोषणा केल्यानंतर शेतकºयांना लाभ मिळाला नाही़ उद्योगपती आदानी, आंबानी हेच देश चालवित असून, त्यांच्या खाजगी कंपन्यांनी शेतकºयांना रात्र-दिवस रांगेत उभे करून पीक विमा भरून घेतला़ खरीप हंगामात मोठे नुकसान झाले असतानाही या कंपन्यांनी विम्यापोटी भरलेल्या रकमेतील १० टक्के रक्कमही शेतकºयांना परत दिली नाही़ राज्य शासन व विमा कंपनीने शेतकºयांची क्रूर चेष्टा केली असून, हा अन्याय पाहवत नसल्याने राज्य व केंद्रात सत्तेत असूनही केवळ समाजहितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचे खा़ जाधव यांनी सांगितले़ यावेळी खा़ बंडू जाधव यांनी आपल्या भाषणात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह इतर नेत्यांवरही तोफ डागत सत्यता पडताळून आरोप करण्याचा सल्ला दिला़
परभणी जिल्ह्यात गंगाखेडमध्ये शिवसेनेचा आक्रोश मोर्चा धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:38 AM