लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सहा अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी ६ मार्च रोजी काढले आहेत़या आदेशानुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांची शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे़ नानलपेठ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे यांची परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक तथा सपोनि शेख उस्मान चाँद यांची सोनपेठ ठाण्यात बदली करण्यात आली आहे़ सेलू येथील सपोनि नितीन काशीकर यांची बामणी पोलीस ठाण्यात तर बामणीचे विजय रामोड यांची सेलू पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे़ पोलीस नियंत्रण कक्षातील सपोनि संतोष पाटील यांची कोतवाली पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे़ सर्व अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या असल्याने त्यांना तातडीने कार्यमुक्त करून नियुक्त ठिकाणी रुजू होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक उपाध्याय यांनी दिले आहेत़
परभणी जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 11:55 PM