सोनपेठ येथे वृद्ध शेतक-याची कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:08 PM2018-01-19T19:08:26+5:302018-01-19T19:08:52+5:30
नरवाडी येथील ज्ञानोबा भाऊराव जोगदंड (76) या शेतक-याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. नापिकी व बँकेचे कर्ज यातून आलेल्या नैराश्यातून जोगदंड यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातवाने पोलिसांनी दिली.
सोनपेठ (परभणी ) : नरवाडी येथील ज्ञानोबा भाऊराव जोगदंड (76) या शेतक-याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. नापिकी व बँकेचे कर्ज यातून आलेल्या नैराश्यातून जोगदंड यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातवाने पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशी कि, जोगदंड यांच्या घरातील सर्वजन शेतात गेले असताना त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे राष्ट्रीय बँकेचे 68000 पीककर्ज आहे. यातच शेतीमधून मर्यादित उत्पन्न झाल्याने नैराश्यातुन त्यांनी हे कृत्य केले अशी माहिती त्याने नातू राजेंद्र यांनी दिली. या प्रकरणी सोनपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय संतोष मुपडे हे करत आहेत.