मराठा समाजातील युवकांवरील गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:13 AM2021-01-10T04:13:38+5:302021-01-10T04:13:38+5:30
परभणी : मराठा क्रांती माेर्चा दरम्यान जिल्ह्यातील मराठा युवकांवर दाखल झालेले गुन्हे शासनाच्या आदेशानुसार मागे घ्यावेत, अशी मागणी संभाजी ...
परभणी : मराठा क्रांती माेर्चा दरम्यान जिल्ह्यातील मराठा युवकांवर दाखल झालेले गुन्हे शासनाच्या आदेशानुसार मागे घ्यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर जिल्ह्यात अनेकवेळा मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलने करण्यात आली. या आंदोलनात सहभागी युवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, जिल्ह्यात अद्याप या युवकांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे शासकीय नोकरीत अर्ज करताना युवकांना अडचणी निर्माण होत आहेत. सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी येथील बाळकृष्ण सुंदरराव देवडे या युवकावर आंदोलनाचा गुन्हा दाखल आहे. शासन आदेशानुसार या युवकावरील गुन्ह्यासह तालुक्यातील सर्व मराठा युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, अशोक बोकन, अमोल गायकवाड, विनोद भोसले, अविनाश गरड, गंगाधर यादव आदींनी केली आहे.