शहरात शनिवारी सकाळी १० च्या दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, बाबुराव घरजाळे, जमादार गोविंद मुरकुटे, ग्यानदेव बेंबडे, जगन्नाथ मुंडे आदी कर्मचाऱ्यांना कोद्री रस्त्यावरील जायकवाडी कमानी जवळून पडदा टाकून जात असलेल्या (एमएच ०४ एफयू १२३५) क्रमांकाच्या आयशर टेम्पोवर संशय आल्याने त्यांनी टेम्पो थांबवून चालक शेख अमीन शेख युसूफ (रा.नसिराबाद, ता. भुसावळ) व क्लिनर इस्माईल इसाक खान (रा.सावदा, ता.रावेर) यांची विचारपूस करत टेम्पोची तपासणी केली असता त्यात प्रत्येकी २० हजार रुपयांप्रमाणे लहान-मोठी १४ जनावरे कोंबून त्यांची बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. जनावरांसह चार लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टेम्पो चालक, क्लिनरसह जनावर मालक व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
टेम्पोत भरलेली जनावरे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:17 AM