सव्वादोन लाखांचे केबल चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:17 AM2021-03-05T04:17:56+5:302021-03-05T04:17:56+5:30

सिंगणापूर ते ताडकळस मार्गे नांदेड या महामार्गाचे इलेक्ट्रीक फर्म मार्फत काम चालू आहे. या कामाचे साहित्य, लोखंडी पोल आदी ...

Twelve lakh cables were stolen | सव्वादोन लाखांचे केबल चोरले

सव्वादोन लाखांचे केबल चोरले

Next

सिंगणापूर ते ताडकळस मार्गे नांदेड या महामार्गाचे इलेक्ट्रीक फर्म मार्फत काम चालू आहे. या कामाचे साहित्य, लोखंडी पोल आदी रोडलगत ठेवण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी मोहन प्रकाशराव गुंगे- देशमुख व ऑटोचालक गजानन गुंगे यांनी २ लाख ३४ हजार २७१ रुपयांचे केबल चोरून गोविंद राजेभाऊ रेंगे यांच्या घरी ऑटोमध्ये आणले. तसेच तुमच्याकडे हे साहित्य राहू द्या, नंतर घेऊन जातो, असे सांगितले. याबाबत रेंगे यांना संशय आल्याने त्यांनी या कामाचे शासकीय कंत्राटदार तथा त्यांचे मित्र भागवत गोपाळराव देशमुख यांना फोन केला. त्यानंतर देशमुख यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन पाहिले असता सदरील साहित्य गायब असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी दैठणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मोहन प्रकाशराव गुंगे- देशमुख व ऑटोचालक गजानन गुंगे (दोघेही रा. सोन्ना, ता. परभणी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Twelve lakh cables were stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.