दवाखान्यासमोरून दोघांची दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:22 AM2021-08-27T04:22:09+5:302021-08-27T04:22:09+5:30
शहरातील देशमुख हाॅटेल परिसरातील रहिवासी मनीष बळीराम शिंदे यांनी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास बसस्थानक परिसरातील ...
शहरातील देशमुख हाॅटेल परिसरातील रहिवासी मनीष बळीराम शिंदे यांनी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास बसस्थानक परिसरातील लाइफ लाईन हाॅस्पिटलसमोरील मोकळ्या जागेत त्यांची एमएच २२ वाय ६५१३ क्रमांकाची दुचाकी उभी करून ते दवाखान्यात त्यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते. रात्री ८ च्या सुमारास दवाखान्याबाहेर आले असता संबंधित ठिकाणी त्यांची दुचाकी दिसून आली नाही. याबाबत २५ ऑगस्ट रोजी शिंदे यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटनाही याच हॉस्पिटल परिसरात घडली. मटकऱ्हाळा येथील तरुण ओंकार पांडुरंग गरुड याने त्याची एमएच २२ जे ६२४९ क्रमांकाची दुचाकी ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ च्या सुमारास उभी केली. त्यानंतर ओंकार दवाखान्यात उपचार घेण्यासाठी गेला. काही वेळाने तो परत आला असता जागेवर दुचाकी दिसून आली नाही. याबाबत ओंकार गरुड याने २१ ऑगस्ट रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.