अशी करता येणार नोंदणी
व्हॉट्सॲप अकाऊंटमध्ये ९०१३१५१५१५ हा क्रमांक समाविष्ट करावा लागेल.
स्वत:च्या व्हॉट्सॲवरून वरील क्रमांकावर बुक स्लॉट हा मॅसेज पाठवावा. त्यानंतर संबंधित मोबाईलवर ६ अंकी ओटीपी प्राप्त होईल.
हा ओटीपी फिड केल्यानंतर दिनांक, केंद्राची माहिती, पिनकोड क्रमांक आणि लसीचा टप्पा आदी माहिती भरून कन्फर्मेशेन करावे लागेल.
नागरिकांसमोर वाढले पर्याय
जिल्ह्यात लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. दररोज ७५ ते ८० केंद्रांवर लसीकरण केले जात आहे.
लसीकरणाच्या नोंदणीसाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन नोंदणी करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.
व्हॉट्सॲपचा वाढता वापर लक्षात घेता आता व्हॉट्सपद्वारेही लस घेण्यासाठी नोंदणी करता येणार आहे.
दिवसभरात ५ हजार नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात गुरुवारी ७५ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. दिवसभरामध्ये एकूण ५ हजार १९२ नागरिकांची लसीकरण झाले आहे. आठवडाभरापासून दररोज लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ५ हजारांपेक्षा अधिक असल्याने लसीकरणाचा वेग वाढला आहे. १६ लाख ८ हजार ८३८ नागरिकांना लस द्यावयाची आहे.