मराठी भाषिक पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:16 AM2021-01-21T04:16:23+5:302021-01-21T04:16:23+5:30
२० जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळात डॉ. विठ्ठल जंबाले यांचे ‘बोली आणि भाषा संवर्धन’ या विषयावर ...
२० जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळात डॉ. विठ्ठल जंबाले यांचे ‘बोली आणि भाषा संवर्धन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. २१ जानेवारी रोजी मुंबईच्या कवयित्री ज्योती हनुमंत भारती यांचे ‘मी आणि माझे साहित्य’ या विषयावर, २२ जानेवारी रोजी निमंत्रित कवींचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये प्रा. सुरेश हिवाळे, डॉ. अशोक पाठक, राही कदम, सुषमा गंगुलवार, अरविंद सगर, दिगंबर रोकडे, राजेश रेवले, शरद ठाकर, मनीषा आंधळे हे कवी ऑनलाईन सहभागी होतील. २३ जानेवारीस ‘मराठवाड्यातील संत कवयित्रींचे योगदान’ या विषयावर डॉ. सविता वावगे यांचे व्याख्यान होईल. २५ जानेवारी रोजी सायंकाळी कथाकार डॉ. माधव जाधव यांचे कथाकथन होईल. २६ रोजी ‘मी आणि माझे साहित्य’ या विषयावर नाटककार व गीतकार प्रा. रविशंकर झिंगरे यांचे भाषण होणार आहे. २८ जानेवारीला प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या भाषिक पंधरवडा कार्यक्रमाचा समारोप होईल. यावेळी प्रा. सावित्री हरिदास-चिताडे, डॉ. श्रीदेवी कडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यशस्वितेसाठी मराठी विभागप्रमुख प्रा. प्रल्हाद भोपे, डॉ. राजू बडूरे, प्रा. अरुणकुमार लेमाडे, प्रा. बळीराम चव्हाण आदी प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांनी ऑन ऑनलाईन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.