मतदान यंत्र सिलिंग प्रक्रिया पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:42 AM2021-01-13T04:42:16+5:302021-01-13T04:42:16+5:30
देवगाव फाटा : सेलू तालुक्यात १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ५५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १७४ मतदान केंद्रांवरील मतदान यंत्र व मतपत्रिका ...
देवगाव फाटा : सेलू तालुक्यात १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ५५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १७४ मतदान केंद्रांवरील मतदान यंत्र व मतपत्रिका मशीनची तहसील कार्यालयात ११ जानेवारी रोजी उमेदवार, प्रतिनिधी व सक्षम निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत सिलिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
सेलू येथील तहसील कार्यालयात ११ जानेवारी रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी, मास्टर ट्रेनर यांनी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत १७४ मतदान केंद्रांवरील मतदान यंत्र व मतपत्रिका मशीनची सिलिंग प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, गटविकास अधिकारी विष्णू मोरे यांची उपस्थिती होती. या दरम्यान उमेदवारांना मतपत्रिकेचा नमुना व अनुक्रमणिका कशी असेल या बाबतची माहिती देण्यात आली. उमेदवारांनी मतदान करून मॉकपोल प्रक्रिया पूर्ण करून मतदान यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
२१ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त
प्रत्येकी ३ ग्रामपंचायतीकरिता एक या प्रमाणे २१ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्र व तेथील भौतिक सुविधेचा आढावा घेतला आहे. तसेच १७४ मतदान केंद्रासाठी ७७२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. १४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता तहसील कार्यालय येथून मतदान केंद्रासाठीचे साहित्य हस्तगत करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे.
५९ कर्मचाऱ्यांनी केली नोंदणी
निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी तहसील प्रशासनाने टपाली मतदान प्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली होती. टपाली मतदानासाठी ५९ कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती प्रवीण डाके यांनी दिली.