शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata Punch On Road Price: Tata Punch ची किंमत जाहीर, कमीत कमी किमतीत जबरदस्त फिचर्स अन् ५ स्टार सेफ्टी रेटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 12:53 PM

1 / 9
Tata Punch Micro SUV कारची किंमत अखेर कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. टाटा पंचच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत ५ लाख ४९ हजार रुपयांपासून सुरू होणार आहे. यात अनेक जबरदस्त फिचर्स, रंगसंगती आणि आकर्षक डिझाइन मिळणार आहे.
2 / 9
टाटा पंचच्या सेगमेंटमध्ये ही कार प्रतिस्पर्धी कंपन्यांना जोरदार टक्कर देणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन या कारचं डिझाइन तयार करण्यात आलं आहे. कंपनीनं ४ ऑक्टोबर रोजी टाटा पंचमध्ये मिळणाऱ्या फिचर्सची सविस्तर माहिती दिली होती. त्यानंतर अनेकांचं लक्ष या जबरदस्त कारनं वेधून घेतलं होतं.
3 / 9
टाटा मोर्टर्सनं तयार केलेल्या या अत्याधुनिक मायक्रो एसयूव्हीच्या आकर्षक डिझाइननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शहरी भागासाठी टाटा पंच एक कॉम्पॅक्ट डिझाइन ठरणार आहे. तर ऑफरोड भागातही टाटा पंच एक बहुपयोगी कार ठरणार आहे. कारण यात जबरदस्त ग्राऊंड क्लिअरन्स आणि चांगला व्हील बेस दिला आहे.
4 / 9
टाटा पंच कार एकूण चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यात Pure व्हेरिअंटची किंमत ५.४९ लाखांपासून सुरू होणार आहे. Adventure व्हेरिअंटची किंमत ६.३९ लाख इतकी असणार आहे. Accomplished व्हेरिअंटची किंमत ७ लाख २९ हजार रुपये आणि सर्वात टॉप मॉडल म्हणजेच Creative व्हेरिअंटची किंमत ८ लाख ४९ हजार रुपये इतकी असणार आहे.
5 / 9
टाटा पंचच्या प्रत्येक व्हेरिअंटमध्ये ग्राहकांसाठी काही खास कस्टमाइज पॅक देखील देण्यात येणार आहे. यात प्रत्येक व्हेरिअंटसोबत काही आणखी फिचर्स ग्राहकांना विकत घेता येणार आहेत.
6 / 9
Pure व्हेरिअंट + रिदम पॅक: ३५,००० रुपये, Adventure व्हेरिअंट + रिदम पॅक: ३५,००० रुपये, Accomplished व्हेरिअंट + डेझल पॅक: ४५,००० रुपये, तर Creative व्हेरिअंट + IRA: ३०,००० रुपये
7 / 9
टाटा पंच फक्त पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध होणार आहे आणि यात दोन ट्रान्समिशन पर्याय असणार आहेत. सध्या तरी कंपनीकडून डिझल मॉडेल लाँच करण्यात आलेलं नाही. टाटा पंचमध्ये १.२ लीटरचं रेवोट्रोन इंजिन देण्यात आलं आहे. यात ८६ पीएस पावर आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करणार आहे. कार फाइव्ह स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि पाच स्पीड एएमटी युनिट देखील मिळणार आहे.
8 / 9
Tata Punch वेगवेगळ्या रंगसंगतीत उपलब्ध करण्यात आली आहे. एकूण सात रंगांमध्ये टाटा पंच उपलब्ध होणार आहे. टाटा पंच कारची लांबी ३८१७ एमएम इतकी आहे. तर उंची १६१५ एमएम इतकी आहे. याशिवाय व्हीलबेस २४४५ एमएम इतकं आहे. कारमध्ये ३६६ लीटरचा बूस स्पेस देण्यात आला आहे.
9 / 9
टाटा पंचची सर्वात महत्त्वाची बाब अशी की, ग्लोबल एजंसी एनकॅपमध्ये टाटा पंच कारला सुरक्षेच्या बाबतीत फाइव्ह स्टार रेटिंग मिळालं आहे. एडल्ट सेफ्टीवर टाटा पंचला १७ पैकी १६.४५ गुण मिळाले आहेत. तर चाइल्ड ऑक्यूमेंट सेफ्टीच्या बाबतीत ४९ पैकी ४०.८९ गुण मिळाले आहेत.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन