8 color's used on number plates in India; Know their importance
भारतात 8 रंगांच्या नंबरप्लेट; जाणून घ्या त्यांचे महत्व, नाहीतर कारवाई होईल By हेमंत बावकर | Published: November 07, 2020 2:14 PM1 / 11आपण दररोज प्रवास करतो, कधी स्वत: वाहन चालवतो किंवा कधी सहप्रवासी असतो. यावेळी आपल्या आजुबाजुला अनेक प्रकारची वाहने ये-जा करत असतात. त्यावर वेगवेगळ्या नंबरप्लेटही लावलेल्या असतात. आता केवळ सरकारी अधिकारी, पोलीस आणि काही मोजक्याच लोकांना लाल दिवा लावण्याची परवानगी आहे. 2 / 11मग अशावेळी आपल्या आजुबाजुने जाणाऱ्या गाड्यांच्या नंबरप्लेटवरून गाडी कोणाची आहे ते ओळखता यायला हवे. काही रंगाच्या नंबरप्लेट या अत्यंत महनीय व्यक्तींच्या असतात. त्यांना वाट न दिल्यास कारवाईही होऊ शकते. 3 / 11देशात वेगवेगळ्या अशा 8 प्रकारच्या रंगांच्या नंबरप्लेट आहेत. प्रत्येक रंगाच्या वाहनाचा वेगवेगळ्या उद्देशासाठी वापर केला .जातो. आज आपण या प्रत्येक रंगाची माहिती घेऊ. 4 / 11देशभरात तुम्हाला सर्वत्र पांढरी आणि पिवळी असे दोन रंगातील नंरप्लेट सर्वाधिक दिसतात. यापैकी पांढऱ्या रंगाची नंबरप्लेट ही खासगी, सामान्य वापरासाठी असते. या नंबप्लेटच्या वाहनाचा व्यवसायासाठी वापर करत येत नाही. यामुळे अनेकांना ही खासगी वापराची गाडी असल्याचे समजते. 5 / 11दुसरा रंग पिवळा. पिवळ्या रंगाची नंबरप्लेट पाहून देखील आपल्याला समजते की ती व्यवसायासाठी वापरली जाणारी गाडी आहे. ट्रक, टॅक्सी, अॅम्बुलन्स, बस आदीसाठी ही पिवळी नंबरप्लेट वापरतात. दोन्ही नंबरप्लेटमधील नंबर हे काळ्या रंगात असतात. 6 / 11निळ्या रंगाची नंबरप्लेट अशा वाहनांना मिळते ज्यातून परदेशांचे प्रतिनिधी प्रवास करतात. या रंगाच्या नंबरप्लेटच्या गाड्या या दिल्लीमध्ये सर्वाधिक आणि मुंबईमध्ये फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. या गाड्या परदेशांच्या दुतावासातील प्रतिनिधी वापरतात. यावर पांढऱ्य़ा रंगात नंबर असतात. 7 / 11काळ्या रंगातील नंबरप्लेटच्या गाड्या या व्यवसायासाठी वापरल्या जातात. परंतू त्या गाड्या खास व्यक्तींसाठी असतात. जसे की झूम कार वगैरे. या गाड्यांच्या नंबरप्लेट या काळ्या रंगात असतात. तर नंबर पिवळ्या रंगात. 8 / 11आता हा रंग खूप महत्वाचा आहे. या रंगातील नंबरप्लेटच्या गाड्या राष्ट्रपती, राज्यपाल किंवा लष्करातील मोठे अधिकारी वापरतात. या गाड्यांच्या नंबरप्लेटवरील रंग हा सोनेरी रंगात असतो. तसेच नंबरप्लेटवर अशोकचक्रही असते. या गाड्या दिसताच रस्त्यावरून पुढे जाण्यासाठी वाट करून द्यावी लागते. 9 / 11लष्करी वाहनांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नंबरप्लेट असतात. त्यांचा उद्देशही वेगवेगळा असतो. ही वाहने संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची असतात. अशा गाड्यांच्या नंबरप्लेटवरील पहिल्या किंवा तिसऱ्या अंकाच्याजागी वरच्य दिशेने दाखविलेला बाण असतो. 10 / 11लष्कराच्या या वाहनांचा नंबर 11 आकडी असतो. बाणानंतर लगेचच दोन अंक असतात. ते हे वाहन कोणत्या वर्षी खरेदी केले आहे, ते दर्शविते. या वाहनांनाही खूप महत्व असते. या वाहनांतून लष्करप्रमुख, ब्रिगेडिअर यांसह ट्रकसारखी वाहने असतील तर त्यातून लष्करी सामग्री किंवा जवानांची नेआण केली जाते. 11 / 11हिरव्या रंगाची नंबरप्लेट ही आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications