After the break ... Launch of the 10th generation of Honda Civic in India
ब्रेक नंतर...होंडा सिव्हीकची 10 वी पिढी भारतात लाँच By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 10:04 AM2019-03-09T10:04:05+5:302019-03-09T10:17:21+5:30Join usJoin usNext जपानची कार निर्माता कंपनी होंडा मोटर्सने भारतात Civic ही आलिशान कार लाँच केली आहे. पाच व्हेरिअंट आणि दोन इंजिन पर्यायामध्ये लाँच झालेल्या होंडा सिव्हीकची किंमत 17.69 लाखांपासून सुरु होत आहे. तर सर्वात वरच्या मॉडेलची किंमत 22.29 लाक रुपये ठेवण्यात आली आहे. वीस वर्षांपूर्वी कंपनीने होंडा सीटीच्या माध्यमातून भारतात बस्तान बसविले होते. मात्र, होंडाच्या इतर कारना एवढे यश गाठता आले नव्हते. सिव्हिकचीही विक्री बंद केली होती. आता होंडाने पुन्हा 10 वे जनरेशन बाजारात आणले आहे. Honda Civic ची टक्कर टोयोटा कोरोला, स्कोडा ऑक्टाव्हिया आणि ह्युंदाई इलांट्राशी होणार आहे. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली ही कंपनीची पहिली कार आहे. ही कार 26.8 किमी प्रती लीटरचे मायलेज देते. नव्या सिव्हिकमध्ये कंपनीने इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक विथ ब्रेक होल्ड, लेन वॉच, अजाईल हँडलिंग असिस्ट, वॉकवे लॉकिंग सारखे फिचर दिले आहेत. हे फिचर या श्रेणीमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. कारमध्ये 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. जी अॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोला सपोर्ट करते. टॉप व्हेरिअंटमध्ये 17 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स, फूल एलईडी हेडलँप, एलईडी फॉग लँप, पावर सनरूफ विथ रिमोट, रेन सेन्सिंग वायपरसारखे फिचर आहेत.टॅग्स :होंडाकारHondacar