बजाजची नवीन CT110 बाइक, जाणून घ्या फीचर्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 08:16 PM2019-07-24T20:16:29+5:302019-07-24T20:21:04+5:30

बजाज ऑटो (Bajaj Auto) कंपनीने स्वस्त आणि मायलेज असलेली शानदार नवीन बाइक CT110 बाजारात आणली आहे. कंपनीने CT110 बाइकला सेल्फ (इलेक्ट्रिक) आणि किक स्टार्ट, दोन व्हर्जनमध्ये लाँच केली आहे.

बजाज कंपनीने दावा केला आहे की, भारतातील सर्वात स्वस्त ही बाइक आहे. बजाज CT110 किक स्टार्ट असणारी बाइक दिल्लीतील एक्स-शोरुममध्ये किंमत 37,997 रुपये आहे. तर सेल्फ स्टार्ट (इलेक्ट्रिक स्टार्ट) असणाऱ्या बाईकची एक्स-शोरुममध्ये किंमत 44,480 रुपये आहे.

बजाज ऑटो डीलरशिप स्टोरमध्ये CT110 बाइक उपलब्ध असणार आहे. सध्या कंपनीने तीन कलरमध्ये ही बाइक बाजारात आणली आहे.

CT110 बाइकमध्ये 115cc DTSi इंजिन आहे. त्यामुळे 8.6PS इतकी पॉवर आणि 9.81 न्यूटन मीटरचे टॉर्क जनरेट होणार आहे.

तसेच, 4 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. यामुळे दोन्ही व्हीलमध्ये ड्रम ब्रेक मिळेल. बाइकचा ग्राऊंड क्लीयरेंस 170mm असणार आहे.

कंपनीने लाँचिंगच्यावेळी सांगितले की, आतापर्यंत सीटी कॅटगरीतील 50 लाखाहून अधिक बाइक विकल्या गेल्या आहेत.