शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अखेर ‘Royal Enfield Meteor 350’ भारतात लॉन्च; स्मार्टफोन कनेक्टसह आकर्षक फिचर्स

By प्रविण मरगळे | Published: November 06, 2020 3:22 PM

1 / 10
अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रॉयल एनफील्डने भारतात Meteor 350 लॉन्च केली आहे. शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी व्हर्च्युअल लॉन्च कार्यक्रमात त्याची किंमत जाहीर केली. Royal Enfield Meteor 350 भारतात १ लाख ७५ हजार ८२५ रुपयांमध्ये बुलेटप्रेमींना मिळणार आहे.
2 / 10
फायरबॉल(Fireball), स्टेलर(Stellar) आणि सुपरनोवा(Supernova) अशा ३ प्रकारांमध्ये ही बुलेट लॉन्च करण्यात आली आहे, यात Yellow, Black आणि Red या आकर्षिक कलर्सचा पर्याय देण्यात आला आहे. ही बाईक होंडा एच'नेस सीबी 350 आणि Jawa Twins यांना टक्कर देईल, मेटियर 350 चे बुकिंग सुरू झालं आहे.
3 / 10
रॉयल एनफील्ड मेटियर 350 फायरबॉलची सुरुवातीची किंमत १ लाख ७५ हजार ८२५ रुपये आहे. स्टेलर व्हेरिएंटची किंमत १ लाख ८१ हजार ३४२ रुपये तर टॉप मॉडेल व्हेरिएंट सुपरनोवाची किंमत १ लाख ९० हजार ५३६ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या १५ पेक्षा अधिक फ्यूल टँक कलरचा पर्याय ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आला आहे.
4 / 10
Royal Enfield Meteor 350 मध्ये बीएस 6 कंप्लेंट 349 सीसीचे एअर कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आहे. जे 20.5 एचपी पॉवर आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. ही ढासू बाईक 5 स्पीड गिअरबॉक्ससह लॉन्च करण्यात आली आहे.
5 / 10
मेटियर 350 मध्ये रॉयल एनफील्डने प्रथमच स्मार्ट कनेक्टिव्हिटी दिली आहे, जेणेकरून आपण रॉयल एनफील्ड अ‍ॅपच्या मदतीने आपला फोन कनेक्ट आणि कंट्रोल करू शकता. तसेच, फोनवर नेव्हिगेशनला कनेक्ट करून इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये ते पाहू शकतो.
6 / 10
रॉयल एनफील्ड मेटियर 350 च्या डिजिटल अ‍ॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये तुम्हाला गिअर पोझिशन्स तसेच ओडोमीटर, फ्यूल गेज, ट्रिप मीटर आणि सर्व्हिस रिमांडर यासारखी फिचर्स दिसतील.
7 / 10
रॉयल एनफील्ड मेटियर 350 च्या उर्वरित फिचर्सबाबत सांगायचं तर यात ड्युअल चॅनेल एबीएस, ट्विन शॉक अब्जॉर्बर, एलईडी डीआरएलसह सर्कुलर हॅलोजन हेडलॅम्प्स, एलईडी टेल लॅम्प्स आणि ४१ मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आहेत. याबरोबरच बसण्याची सीटही आरामदायक ठेवण्यात आली आहे.
8 / 10
थंडरबर्डची जागा म्हणून रॉयल एनफील्ड मेटियर 350 लॉन्च होत आहे. या दोन बाईक्समध्ये बरेच साम्य आहे. परंतु नवीन मेटियर 350 मध्ये थंडरबर्डपेक्षा अधिक फिचर्स आहेत तसेच ती कंपनीच्या नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे.
9 / 10
350 मध्ये अ‍ॅलोय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स आहेत. ब्रेकिंग फिचर्समध्ये सांगायचं झालं तर त्यात फ्रंटला 300 मिमी आणि रियरमध्ये (मागील बाजूस) 270 मिमीचा डिस्क ब्रेक आहे. सुरक्षिततेसाठी, यात ड्युअल चॅनेल एबीएस(ABS) सुविधा दिली आहे.
10 / 10
350 चे बुकिंग सुरू झालं आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा डिलरशिपला भेट देऊन तुम्ही ही बाईक बूक करू शकता. कंपनीने म्हटलं आहे की उद्यापासून बाईकची डिलिव्हरी करण्यात येईल. त्याशिवाय कंपनी ३५० शहरांमध्ये ५६० डिलरशिपला भेट देऊन ग्राहक आजपासून मेटियर 350 ची टेस्ट ड्राइव्हदेखील घेऊ शकतात.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईकIndiaभारत