Children also need a helmet, a booster seat in the car; new rule by nitin gadkari
लहान मुलांनाही हेल्मेट, कारमध्ये बुस्टर सीट लागणार; गडकरींनी केला नियम By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 9:32 AM1 / 7भारत सध्या रस्ते अपघातांमुळे त्रस्त आहे. यामुळे केंद्र सरकारने सुरक्षेकडे अधिक लक्ष पुरविले आहे. लहान मुलांसाठी बाईकवर हेल्मेट घालावेच लागणार असून कारमध्येही सुरक्षेसाठी बूस्टरसीट बसवावी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मोटार वाहन संशोधन विधेयक 2019 मध्ये याची तरतूद केली आहे. 2 / 7केंद्रीय मोटर वाहन कायदा 1988 मध्ये संशोधन करण्य़ात आले आहे. यामध्ये एक नवीन कलम 129 जोडण्यात आले असून यामध्ये चार वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी बाईकवरून जाताना हल्मेट घालावे लागणार आहे. तसेच हे हेल्मेट सामान्य नको, तर आयएसआय मार्कचेच असले पाहिजे. शीख धर्माच्या व्यक्तीला तेव्हाच हेल्मेट घालण्यास सूट मिळेल जेव्हा त्याने पगडी घातलेली असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. 3 / 7गडकरी यांनी सोमवारी हे विधेयक संसदेत मांडले. यामध्ये अॅम्बुलन्स, अग्निशामन सारख्या आपत्कालीन वाहनांना पुढे जाण्यासाठी रस्ता न दिल्यास 10 हजारांचा दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार असल्याचेही म्हटले आहे. 4 / 7या विधेयकामध्ये लहान मुलांसाठी आणखी दोन नियम करण्यात आले आहेत. कारमध्ये बुस्टर सीट लावावी लागणार आहे. मागील सीटवर बसल्यास हा नियम लागू होणार आहे. मागील सीटवर बुस्टर किंवा चाईल्ड सीट लावता येते ज्यामध्ये लहान मुलाला बसवून त्याला सीटबेल्ट लावता येणार आहे. यामुळे अचानक ब्रेकिंग किंवा अपघात झाल्यास मुलाला मार बसण्याची शक्यता कमी होईल.5 / 7या विधेयकामध्ये आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे, वाहन चालक कोणीही असो त्याला मुलाची ने-आण करताना सुरक्षा करणे वाहन चालकाची जबाबदारी असणार आहे. म्हणजेच रिक्षा चालक, स्कूल व्हॅनचा ड्रायव्हर किंवा ज्याच्यासोबत लहान मुल जात असेल तर त्याला सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी चालकाची असेल. 6 / 7सायलेन्स झोनमध्ये हॉर्न अनावश्यक असताना वाजविल्यास त्या व्यक्तीला 1000 रुपयांचा दंड होणार आहे. जर त्याने ही चूक पुन्हा पुन्हा केली असल्यास हा दंड दुप्पट आकारला जाणार आहे. 7 / 7सायलेन्स झोनमध्ये हॉर्न अनावश्यक असताना वाजविल्यास त्या व्यक्तीला 1000 रुपयांचा दंड होणार आहे. जर त्याने ही चूक पुन्हा पुन्हा केली असल्यास हा दंड दुप्पट आकारला जाणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications