शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Electric vs Petrol Scooter: 1 किमीमागे किती खर्च होतो? पेट्रोल आणि इलेक्ट्रीक स्कूटरचे गणित जाणून घ्या, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 5:12 PM

1 / 9
पेट्रोलची किंमत 110-112 रुपयांच्या वर गेली आहे. अशावेळी तुम्हाला पेट्रोलची स्कूटर परवडेल की इलेक्ट्रीक या दुविधेत अडकला असाल. कोणती स्कूटर फायद्याची ठरेल हे तुम्हाला ठरवायचे आहे. परंतू त्या आधी तुम्ही जेव्हा 1 किमी तुमची पेट्रोलवरील स्कूटर चालविता तेव्हा तुम्हाला किती नुकसान होते हे जाणून घ्या. (electric vs petrol scooter)
2 / 9
पेट्रोलची किंमत वाढल्याने आता तुमचा प्रति किमीचा खर्चही वाढणार आहे. आता एवढे वाढलेच आहे तर ते कमी होण्याची शक्यताही कमीच आहे. झालेच तर तीन-चार रुपयांनी कमी होईल. मग तुम्हाला तुमची स्कूटर परवडेल का? हा विचार करणे गरजेचे आहे. तसेच जर तुम्हाला स्कूटर घ्यायची असेल तर पेट्रोलवर चालणारी स्कूटर चांगली की इलेक्ट्रीक (Electric two wheeler) फायद्याची याचा देखील विचार करावा लागेल.
3 / 9
आज आपण पेट्रोल वाहन आणि इलेक्ट्रीक वाहनावरील खर्चाचे गणित सांगणार आहोत. हे गणित एक किमी आणि 10000 किमी असे मांडण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला 1 किमी जाण्यासाठी येणारा खर्च आणि 10000 किमी गेल्यावर तुम्ही किती कमावले, किती गमावले याचा लेखाजोखा अंदाजे यात असणार आहे. (Electric two wheeler vs Petrol two wheeler)
4 / 9
ओलाची एस १ आणि एस १ प्रो अनुक्रमे 121 आणि 181 किमीची रेंज देतात. Ather 450X - 116 किमी, TVS iQube- 75 किमी. ओलाची स्कूटर पूर्ण चार्ज करण्यासाठी अनुक्रमे 20.56 रुपये आणि 27.39 रुपये खर्च होईल. तर एथरची स्कूटर 20.01 रुपये व टीव्हीएसची 17.25 रुपये खर्च येईल.
5 / 9
ओलाच्या स्कूटरला 1 किमी जाण्यासाठी 25 पैसे खर्च येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर एथरच्या स्कूटरला एक किमीसाठी 35 पैसे आणि टीव्हीएसला 30 पैसे खर्च येतो.
6 / 9
म्हणजेच 10000 किमीचे अंतर जाण्यासाठी ओलाच्या स्कूटरला 2500 रुपये, एथरच्या स्कूटरला 3500 रुपये आणि टीव्हीएसच्या स्कूटरला 3000 रुपयांचा खर्च येईल.
7 / 9
पेट्रोलवरील स्कूटरचे मायलेज 50 ते 60 किमी पकडले तर आजच्या पेट्रोलच्या दराने १ किमी जाण्यासाठी किती खर्च येतो? 10000 किमीसाठी किती खर्च येतो. कधी विचार केलाय का?
8 / 9
45 ते 50 चे मायलेज असेल तर 1 किमी जाण्यासाठी 2.48 ते 2.24 रुपये खर्च येईल. (पेट्रोल 112 रुपये लीटर) तर 10000 किमी जाण्यासाठी 24800 रुपये आणि 22400 रुपये खर्च येईल.
9 / 9
म्हणजे एकदा का स्कूटरमध्ये पैसे टाकले की 10000 किमी जाण्यासाठी इलेक्ट्रीक स्कूटरला 2500 ते 3500 रुपये खर्च येईल आणि पेट्रोल स्कूटरला त्याच्या नऊ ते दहापट. इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत जरी जास्त असली तरी ती पहिल्या 10000 किमीच्या चालविण्यातच कव्हर होते. आता तुम्ही ठरवा नवी स्कूटर घ्यायची असेल तर पेट्रोल वरची घेणार की इलेक्ट्रीकवरची.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनPetrolपेट्रोल