From hardik Pandya to Shikhar Dhawan, theseemerging cricketer's have luxury cars
हार्दिक पांड्या ते शिखर धवन पर्यंत, या आहेत उभरत्या क्रिकेटपटूंच्या लक्झरी कार By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 4:23 PM1 / 7स्पोर्ट कार म्हणजे अनेकांना हवीहवीशी वाटणारी असते. तिचा लूक, परफॉर्मन्स आदी अप्रतिम असतो. मात्र, अशा कार घेणे अनेकांचे स्वप्नच बनून राहते. साध्या कुटुंबात राहणाऱ्या, क्रिकेटचे किट ओढत नेणाऱ्या अशा काही क्रिकेटरांचे हे स्वप्न मात्र पूर्ण झाले आहे. भारतीय क्रिकेट संघामध्ये एकदा का एन्ट्री मिळाली की त्या खेळाडूचे नशीबच बदलून जाते. असेच काही उभरते क्रिकेटपटू त्यांच्या स्वप्नातही नसलेली कार घेऊन फेरफटका मारत आहेत. 2 / 7भुवनेश्वर कुमारने काही वर्षांपूर्वी भारतीय संघात जागा मिळविली तेव्हा सर्वांना आश्चर्यचकित केले होते. वेगवान गोलंदाजी करताना त्याने समोरच्या टीमची दैना उडविली होती. उत्तर प्रदेशमधून आलेल्या या क्रिकेटपटूकडे पांढऱ्या रंगाची BMW 530d M-Sport सेदान कार आहे. 3 / 7दिनेश कार्तिक हा विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून भारतीय संघात आला होता. कार्तिककडे पोर्श्चची स्पोर्ट कार आहे. या कारचा सर्वाधिक वेग 270 किमी प्रतितास आहे. Porsche Cayman S या कारला 0 ते 100 किमीचा वेग पकडण्यासाठी केवळ 5 सेकंद लागतात. 4 / 7चेतेश्वर पुजारा हे नाव जरी भारतीय क्रिकेटसाठी नवे नसले तरीही त्याला प्रसिद्धीच्या वन डे संघात फारसे स्थान दिले जात नाही. मात्र, टेस्ट क्रिकेटसाठी पुजाराची निवड प्राधान्याने केली जाते. पुजाराकडे Audi Q3 SUV आहे. या कारचे इंजिन 2.0 लीटरचे असून ते 181 बीएचपी ताकद निर्माण करते. 5 / 7करुण नायर हे नाव तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आले जेव्हा त्याने इंग्लंडविरोधात टेस्ट मॅचमध्ये तिहेरी शतक ठोकले होते. त्या आधी करुण हा अन्य क्रिकेटपटूंएवढा प्रसिद्ध नव्हता. पण या पठ्ठ्याने या शतकानंतर फोर्डची मस्तंग ही स्पोर्ट कार खरेदी करत आनंद साजरा केला होता. ट्रिपल सेच्युरीमुळे त्याला विशेष रिजस्ट्रेशन अंतर्गत त्याच्या खेळी एवढाच 303 नंबर मिळाला आहे. Ford Mustang मध्ये 5 लीटरचे इंजिन देण्यात आले आहे. 6 / 7भारताचा सलामीवीर शिखर धवन मागे राहिल तर नवल. धवनकडे मर्सिडीजची Mercedes-Benz GL 350 डिझेल इंजिनवाली एसयुव्ही आहे, जी भारतात जर्मनीच्या या कंपनीची एक सर्वोत्तम कार आहे. 7 / 7भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याही काही कमी नाही. त्याच्याकडे लँड रोव्हरची रेंज रोव्हर व्होगसह अन्य कार आहेत. मात्र, त्याच्या ताफ्यात आता Mercedes AMG G63 SUV ही ताकदवान एसयुव्ही आली आहे. या कारची भारतातील किंमत 2.19 कोटी एक्सशोरुम सुरू होते. ही 9 स्पीड अॅटोमॅटीक एसयुव्ही आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications