शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: ...तर काचबंद कारमध्येही कोरोना येईल; ही चूक टाळा, या टिप्सद्वारे वाहन सॅनिटाईज करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 1:40 PM

1 / 10
Tips to Sanitize car from Coronavirus: देशात कोरोनाचा आक्राळ- विक्राळ प्रसार होऊ लागलेला आहे. जेवढी सावधगिरी बाळगावी तेवढी कमीच आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण खुलेआम फिरत आहेत. त्यांच्यासोबत आजुबाजुने आपणही येत-जात असतो. कोरोनाचा हवेतून प्रसार वाढल्याचा इशारा गेल्याच आठवड्यात केंद्राने दिला आहे.
2 / 10
बाजारात, कामासाठी बाहेर पडावे लागते. यासाठी आपण खासगी वाहने वापरतो. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने वाहनांवरही कोरोनाचे विषाणू बसण्याची शक्यता असते. काही अशा जागा आहेत, जिथे कोरोना असण्याची दाट शक्यता आहे.
3 / 10
कारमधून प्रवास करताना जरी काचा लावल्या तरीदेखील दरवाजावरील हँडल, दरवाजाचा वरील भाग, मिरर सारख्या जागा जिथे आपण किंवा दुसरा कोणी हात वारंवार लावतो. यामुळे हे भाग डिसइन्फेक्ट करणे गरजेचे आहे.
4 / 10
दुचाकी कुठे पार्किंगमध्ये पार्क केली तर त्याच्या हँडलला टेकून, किंवा सीटवर बसणे, आरशात पाहण्यासाठी आरशाला हात लावणे आदी प्रकार अनोळखींकडून केले जातात. यामुळे त्याच ठिकाणी पुन्हा तुमचा हात लागला तर कोरोनाचे संक्रमण होण्यची शक्यता बळावते.
5 / 10
काही अभ्यासानुसार कोरोनाचा विषाणू प्लॅस्टीक किंवा लोखंडी भागावर तीन तीन दिवस जिवंत राहू शकतो. यामुळे हे हॉट स्पॉट निर्जंतूक करणे गरजेचे आहे.
6 / 10
कार किंवा स्कूटर निर्जंतूक करण्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पाणी आणि साबणाने धुणे. हे सर्वांना माहिती आहे. परंतू ते रोज शक्य नाही. डॉक्टरही साबण आणि पाण्यात २० सेकेंदांपर्यंत हात धुण्यास सांगतात. कार धुण्यासाठी शक्य झाल्यास थोडे कोमट पाणी वापरावे.
7 / 10
सॅनिटायझर चा जास्त वापर केल्यास रंग खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे ६० ते ७० टक्के अल्कोहोलचे प्रमाण असलेल्या disinfectant किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. नरम कपडा त्यात पाणी मिसळून कार किंवा स्कूटरवरून फिरवल्यास रंगालाही कोणते नुकसान होणार नाही आणि कोरोना विषाणूदेखील नष्ट होतील.
8 / 10
दरवाजाचा हँडल, काचा आणि स्टेअरिंग, एसीची बटने, गिअर रॉड आदी ज्या ज्या भागांना तुम्ही स्पर्ष करता त्यांना स२निटाईज करावे. स्कूटरचेही स्पर्ष होणारे भाग सॅनिटाीज करावेत.
9 / 10
कारमध्ये आतून दरवाजा उघडण्याचे बटन, विंडो पॅनल बटन, लॉक बटन, हँडब्रेक, वायपर बटन आदी साफ करावेत.
10 / 10
खूप महत्वाचे म्हणजे कारमध्ये अतिप्रमाणात सॅनिटायझर ठेवू नये. बाहेर पडताना आणि आत बसताना हात सॅनिटाईज करावेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcarकारscooterस्कूटर, मोपेडbikeबाईक