शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भन्नाट! TATA नंतर आता ‘ही’ कंपनी उभारणार १० हजार EV चार्जिंग स्टेशन; सुविधा वाढवण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 4:19 PM

1 / 12
केंद्रातील मोदी सरकारने काही प्रमाणात दिसाला दिला असला, तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर देशभरात सार्वकालिक उच्चांकांवर आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत चालला आहे. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये अनेकविध कंपन्या आपली वाहने उतरवत आहेत.
2 / 12
काही कंपन्यांनी आपली आगामी बहुतांश उत्पादने इलेक्ट्रिक असतील, असे म्हटले आहे. भारतीय बाजारपेठेतही इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारचा ग्राहक मोठ्या संख्येने वाढताना पाहायला मिळत आहे.
3 / 12
यातच आता भारतातील अग्रगण्य तेल उत्पादक कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOC) देशभरात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य यांनी ही घोषणा केली.
4 / 12
भारतातील EV पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी पुढच्या ३ वर्षांमध्ये २०२४ पर्यंत देशभरात १० हजार EV चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा कंपनीने केली आहे. पुढील १२ महिन्यांत २ हजार ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापित केले जातील आणि पुढील २ वर्षांत आणखी ८ हजार चार्जिंग स्टेशन स्थापित केले जातील.
5 / 12
यामुळे पुढील तीन वर्षांत १० हजार ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचे ध्येय गाठता येईल, असे वैद्य यांनी यावेळी बोलताना सांगितले. ईव्ही वापरकर्त्यांसाठी सुविधा सुधारण्यासाठी अधिक चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या अवलंबनाला चालना देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
6 / 12
भारतातील प्रमुख तेल कंपनी IOC डिझेल-प्रभुत्व असलेल्या पेट्रोलियम उत्पादनांच्या बाजारपेठेतील ४० टक्क्यांहून अधिक नियंत्रित करते. इलेक्ट्रिक वाहने आणि स्वच्छ इंधनासोबतच केंद्राच्या स्वच्छ ऊर्जेसाठी अधिक जोर देऊन कंपनी आपल्या व्यवसायात सुधारणा करत आहे.
7 / 12
IOC ने इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात प्रवेश करणे ही नवीन गोष्ट नाही. कंपनीने आपल्या ७६ पेट्रोल पंपांवर EV-चार्जिंग पॉइंट्स आणि आणखी ११ आउटलेटवर बॅटरी-स्वॅपिंग सुविधा आधीच स्थापित केल्या आहेत.
8 / 12
IOC कंपनी विविध प्रगत बॅटरी तंत्रज्ञानाचे देखील मूल्यांकन करत आहे. इलेक्ट्रिक वाहने तसेच स्टेशनरी अॅप्लिकेशन्ससाठी मेटल-एअर बॅटरी-निर्मिती संयंत्रे उभारण्याचाही कंपनीचा मानस आहे. आमचा भारताची ऊर्जा कंपनी बनण्याचा मानस आहे.
9 / 12
केवळ पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीपुरते मर्यादित राहू इच्छित नाही. जग बदलत आहे. आम्ही ऑटो-एलपीजी आणि पारंपरिक इंधन ऑफर करण्यासाठी वचनबद्ध आहोत. त्याचवेळी, आम्ही आमच्या पेट्रोल पंपावर ईव्ही चार्जिंग पॉइंट आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स उभारण्याचा मानस आहे, असे वैद्य यांनी यापूर्वी म्हटले होते. IOC सोबतच इतर अनेक कंपन्यांनीही त्यांच्या चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे.
10 / 12
दरम्यान, अलीकडेच देशातील सर्वात मोठी, खाजगी क्षेत्रातील एकात्मिक कंपनी Tata Power कंपनीने देशभरात १ हजार पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे (EV) चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क उभारले आहे. पर्यावरणपूरक गतिशीलतेच्या दिशेने भारताच्या वाटचालीमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा टाटा पॉवरने पार केला.
11 / 12
Tata Power देशभरात १००० सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क ऑफिसेस, मॉल्स, हॉटेल्स, रिटेल आउटलेट्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी टाटा पॉवरच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि अखंडित ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध केली आहे.
12 / 12
Tata Power टाटा पॉवर ईझेड चार्जर्सच्या इकोसिस्टिममध्ये सार्वजनिक चार्जर्स, कॅप्टिव्ह चार्जर्स, बसेस/ताफ्यांसाठी चार्जर्स आणि घरगुती चार्जर्स यांच्या संपूर्ण मूल्य शृंखलेचा समावेश आहे. देशभरातील सर्व महामार्गांना ई-हायवे बनवण्यासाठी १० हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची कंपनीची योजना आहे.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनElectric Carइलेक्ट्रिक कारTataटाटा