Komaki XGT X1 Electric Scooter Gets Price Revision Now Starts at Rs 45000 in India
45 हजारांपर्यंत मिळतेय 'ही' Electric Scooter; सिंगल चार्जमध्ये मिळते 120kms पर्यंत रेंज By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 12:52 PM1 / 8Komaki XGT-X1 या इलेक्ट्रीक स्कूटरच्या 25 हजारांहून अधिक युनिट्सच्या विक्रीनंतर कंपनीनं या स्कूटरचं एक परवडणारं व्हर्जन लाँच केलं आहे. 2 / 8कोमाकी इलेक्ट्रीक व्हेईकल्सनं 45,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत (एक्स-शोरूम, भारत) लीड-अॅसिड बॅटरी असलेली स्कूटर लाँच केली आहे. कंपनीने यापूर्वी जून महिन्यात लिथियम-आयन बॅटरीसह ही स्कूटर लाँच केली होती. लिथियम-आयन बॅटरी व्हर्जनची किंमत ६० हजार रुपये आहे.3 / 8कोमाकी इलेक्ट्रीक डिव्हिजनचे संचालक गुंजन मल्होत्रा म्हणाले, 'हे मॉडेल तयार करण्यासाठी अनेक वर्षे रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं काम करण्यात आलं आहे. आता आम्हाला हे मॉडेल बाजारात लाँच करताना आनंद होत आहे.4 / 8नेहमीप्रमाणे, आम्ही डिझाईन करताना खर्च आणि त्याच्या फीचर्सवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यात काही जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत आणि ते केवळ कोमाकी इलेक्ट्रीक वाहनांमध्येच आढळतील असं मल्होत्रा म्हणाले.5 / 8कमी किंमत असूनही, Komaki XGT-X1 इलेक्ट्रीक स्कूटरला टेलिस्कोपिक शॉकर्स, अँटी-थेफ्ट लॉक सिस्टीम, रिमोट लॉक आणि इतर अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारची तांत्रिक समस्या असल्यास स्कूटरमधील इमर्जन्सी रिपेअर स्विच (Emergency Repair Switch) कोणत्याही प्रकारची तांत्रिक समस्या असल्यास ते आपोआप दुरुस्त करण्यास मदत करेल.6 / 8स्कूटरची अँटी थेफ्ट लॉक स्कूटर चोरी होण्यापासून त्याचं संरक्षण करतात. कंपनी स्कूटरच्या लिथियम-आयन बॅटरी व्हेरिअंटवर 2+1 (1 वर्षाची सर्व्हिस वॉरंटी) वर्षे आणि लीड-अॅसिड बॅटरी पॅकवर 1 वर्षाची वॉरंटी देत आहे.7 / 8कंपनीचे म्हणणे आहे की स्कूटरमध्ये दिलेल्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे सिंगल चार्जवर 100 ते 120 किमी (इको मोडमध्ये) इतकी रेंज देऊ शकते.8 / 8ही बॅटरी गेम-चेंजर म्हणून सिद्ध होऊ शकते जी रायडरला बॅटरी संपण्याची चिंता न करता लांब अंतर पार करण्यास मदत करते. स्कूटरमध्ये एक मोठी आरामदायक सीटही आहे, जी दोन लोकांना सहज प्रवास करण्यासाठी देण्यात आली आहे. यामध्ये मोठी बूट स्पेसही देण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications