शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tesla ला देणार टक्कर; आली 830kms ची रेंज देणारी जबरदस्त Electric Car

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 5:22 PM

1 / 7
अमेरिकन इलेक्ट्रीक कार उत्पादक कंपनी Lucid ने आपली पहिली लक्झरी इलेक्ट्रीक सेडान कार Air Dream Editon सादर केली आहे. विशेष बाब म्हणजे ही अमेरिकेतील सर्वाधिक रेंज देणारी इलेक्ट्रीक कार आहे.
2 / 7
दरम्यान, कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार सिंगल चार्जमध्ये ही कार 830 किमीची रेंज देते. कारची ही रेंज युएस एनवायरमेंट प्रोटेक्शन एजन्सीनं प्रामाणित केलं आहे. या कारची रेंज Tesla Model S Long Range पेक्षा 200 किमीनं अधिक आहे. Tesla Model S Long Range ही कार 651 किमीची रेंज देते.
3 / 7
एअर ड्रीम एडिशनची अधिकृत रेंज हा एक असा आकडा आहे जो माझ्या नजरेत कोणत्याही इलेक्ट्रीक व्हेईकलसाठी एक नवा रेकॉर्ड आहे, असं ल्युसिड मोटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि टेस्लाच्या मॉडेल एस सेडानचे माजी मुख्य अभियंता पीटर रॉलिन्सन म्हणाले.
4 / 7
Lucid Air Dream Edition ही इलेक्ट्रीक कार 830किमीची रेंज देते. या कारची अधिकृत रेंज समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली. यामध्ये 8 टक्क्यांची वाढ झाली आहे.
5 / 7
Lucid Air Dream Edition ही इलेक्ट्रीक कार दोन व्हेरिअंट्स आणि परफॉर्मन्समध्ये येते. एपीएज्वारे 836 किमीची रेंज कंपनीच्या ड्रीम एडिशनमध्ये मिळते. याणध्ये 19 इंचाचे व्हिल्स देण्यात आले आहेत. शिवाय ल्युसिड एअर ड्रीम एडिशन परफॉर्मन्स व्हेरिअंटमध्ये 758 किमीची रेंज मिळते. दोन्ही कारमध्ये 21 इंचाच्या व्हिल्सचाही ऑप्शन मिळतो. परंतु त्यामुळे रेंजवर परिणाम होतो.
6 / 7
कंपनीच्या योजनेनुसार ५०० पेक्षा कमी एअर ड्रीम एडिशन इलेक्ट्रीक लक्झरी कारचं उत्पादन करण्यात येणार आहे. याची किंमत १ लाख ६९ हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास १.२५ कोटी रूपयांच्या जवळपास असू शकते.
7 / 7
याचं एक ग्रँड टुरिंग व्हर्जनदेखील असेल आणि त्यामध्येही ग्राहकांना जवळपास 830 किमीची रेंज मिळते. दुसऱ्या व्हर्जनचं उत्पादन याच वर्षी सुरू होणार आहे याची किंमत १.३९ लाख डॉलर्स म्हणजे जवळपास १ कोटी रूपये असण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनAmericaअमेरिकाTeslaटेस्ला