Mahindra Atom EV: Mahindra's cheapest electric car to launch soon; Price less than 4 lakhs
Mahindra Atom EV: लवकरच लॉन्च होणार Mahindra ची स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत 4 लाखांपेक्षा कमी... By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 5:13 PM1 / 9 Mahindra Atom EV: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. कंपन्यांसह ग्राहकही या वाहनांमध्ये रस घेऊ लागले आहेत. मोठ्या वाहन निर्मात्यांबरोबरच, लहान-मोठे स्टार्टअप देखील आता इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत.2 / 9 भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा इलेक्ट्रिकने ट्रेओ ऑटो, ट्रेओ जोर डिलिव्हरी व्हॅन, ट्रेओ टिपर प्रकार आणि ई-अल्फा मिनी टिपरसह अॅटम क्वाड्रिसायकल सादर केली आहे.3 / 9 इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटमध्ये महिंद्राचा बाजारातील हिस्सा 73.4 टक्के आहे, ज्यामुळे कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे.4 / 9 इलेक्ट्रिक पॉवरवर चालणारी महिंद्रा अॅटम आरामदायी आणि स्मार्ट वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. Atom सोबत, महिंद्राने इलेक्ट्रिक अल्फा टिपर देखील बाजारात आणले आहे, जे ई-अल्फा मिनी प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. 5 / 9 ई-अल्फा मिनी टिपर 1.5 kWh बॅटरी पॅकसह आहे, जो एका चार्जवर 80 किमी पर्यंतची रेंज देतो. त्याची लोडिंग क्षमता 310 किलो आहे. 6 / 9 सध्या महिंद्रा अॅटम हे व्यावसायिक वाहन म्हणून लॉन्च करण्यात आले आहे, जे वैयक्तिक वापरासाठी लॉन्च केले जाईल की नाही हे अद्याप माहित नाही.7 / 9 महिंद्रा अॅटम ही लूक आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत पैसा वसूल कार आहे. या कारची किंमतदेखील खूपच कमी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एका अंदाजानुसार, कारची किंमत सुमारे 3 लाख रुपये असेल.8 / 9 महिंद्रा अॅटमचा कमाल वेग 50 किमी/तास असेल गाडीला आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतील. अॅटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल एका चार्जवर 120 किमी पर्यंत चालवता येते. 9 / 9 नुकतेच महिंद्राच्या या इलेक्ट्रीक गाडीचे मॉडेल पुण्यात झालेल्या अल्टरनेट फ्यूल कॉन्क्लेव 2022 मध्ये सादर करण्यात आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications