maruti suzuki alto 800 production stopped and company discontinued this model
२३ वर्ष ग्राहकांच्या मनावर अधिराज्य; मारूती सुझुकीची 'ही' कार इतिहास जमा होणार By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 6:16 PM1 / 6भारतीय बाजारपेठेतील एंट्री लेव्हल हॅचबॅक सेगमेंटमध्ये अल्टो ही लाखो लोकांची आवडती कार आहे. Alto 800 लोकांच्या हृदयात २३ वर्षे टिकून राहिली आणि आता कंपनीने आपली सर्वात स्वस्त कार विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 / 6इंडो-जपानी कंपनीने जाहीर केले आहे की, मारुती सुझुकी अल्टो 800 चे उत्पादन थांबविण्यात आले आहे आणि स्टॉकमध्ये शिल्लक असलेली सर्व वाहने विकल्यानंतर मॉडेल बंद केले जाईल. मारुती अल्टो 800 चे सध्याचे भारतीय ब्रँड किंमती रु. ३.५४ लाख एक्स-शोरूम पासून सुरू होतात.3 / 6१ एप्रिलपासून लागू होणार्या BS6 स्टेज २ नियमांचे पालन करण्यासाठी Alto 800 अपग्रेड करणे सोपे आणि व्यवहार्य नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. Alto 800 च्या विक्रीतही कालांतराने लक्षणीय घट झाली आहे. 4 / 6Alto 800 ची किंमत ३.५४ लाख ते ५.१३ लाख रुपये (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) आहे. हे मॉडेल बंद केल्यामुळे Alto K10 ही आता मारुती सुझुकीची एंट्री-लेव्हल हॅचबॅक आहे ज्याच्या किमती रु. ३.९९ लाख ते रु. ५.९४ लाख, एक्स-शोरूम आहेत.5 / 6मारुती सुझुकी अल्टो 800 मध्ये 796cc पेट्रोल इंजिन आहे, जे ४८ PS ची कमाल पॉवर आणि 69 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. ही हॅचबॅक सीएनजी पर्यायातही उपलब्ध आहे. CNG मोडमध्ये, Alto 800 41PS पॉवर आणि 60Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. 6 / 6अल्टो सीएनजीला ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. २००० मध्ये लॉन्च झाल्यानंतर कंपनीने भारतीय बाजारात एकूण १८ लाख अल्टोसची विक्री केली होती. यानंतर, Alto K10 ने २०२१ मध्ये २०२० मध्ये लॉन्च केलेल्या Alto K10 चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केले. ज्यामध्ये अधिक चांगले लुक आणि वैशिष्ट्ये आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications