शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वदेशी मारुतीची कमाल! निर्यातीत Hyundai, Kia ला धोबीपछाड देत बनली नंबर १; दबदबा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 3:51 PM

1 / 9
गेल्या काही महिन्यांपासून सेमीकंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे सर्वच ऑटोमोबाइल कंपन्या अडचणीत आल्या आहेत. मात्र, अशाही परिस्थिती स्वदेशी कार निर्माता मारुतीने भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा कायम राखला आहे.
2 / 9
कार विक्रीमध्ये मारुतीला टक्कर देणारी कंपनी आज देशात नाही. इतकेच नव्हे, तर विक्रीच्या बाबतीत मारुती कंपनीच्या जवळपासही कोणतीच कंपनी आताच्या घडीला नाही. यातच आता निर्यातीतही मारुतीने कमाल कामगिरी केली आहे.
3 / 9
भारतात पॅसेंजर व्हेइकल निर्यातीत जबरदस्त वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या ९ महिन्यात वाहनांची निर्यात ४६ टक्के वाढले आहे. यात मारुती सुझुकी इंडियाने जवळपास १.६६ लाख यूनिट विदेशात पाठवून पहिले स्थान मिळवले आहे.
4 / 9
सियामने लेटेस्ट डेटा जारी केला असून, यामध्ये निर्यातीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एप्रिल - डिसेंबर २०२१ - २०२२ मध्ये एकूण पॅसेंजर व्हेइकल (पीव्ही) निर्यात ४,२४,०३७ यूनिट आहे. तर एका वर्षापूर्वी हे २,९१,१७० यूनिट होते.
5 / 9
पॅसेंजर व्हेइकल शिपमेंटमध्ये २,७५,७२८ यूनिटमध्ये ४५ टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. तर यूटिलिटी व्हीकल एक्सपोर्ट ४७ टक्के वाढून १,४६,६८८ यूनिटवर पोहोचला आहे, अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्यूफॅक्चरर्सच्या आकडेवारीवरून मिळाली आहे.
6 / 9
एप्रिल - डिसेंबर २०२१-२२ मध्ये व्हॅनचे एक्सपोर्ट जवळपास दुप्पट होऊन १,६२१ यूनिट झाले आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात समान अवधीत हे ८७७ यूनिट होते. यानंतर ह्युंदाई मोटर इंडिया आणि किआ इंडिया दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिली आहे.
7 / 9
देशातील सर्वात मोठी कार मॅन्यूफॅक्चरर कंपनी मारुती सुझुकी इंडियाने १,६७,९६४ पॅसेंजर्स व्हेइकलला निर्यात केले. जे गेल्या आर्थिक वर्षात समान अवधीत ५९,८२१ यूनिटच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. याशिवाय, कंपनीने ९ महिन्याचा अवधी दरम्यान १९५८ सुपर कॅरी एलसीव्ही वाहने पाठवली.
8 / 9
मारुती सुझुकी इंडियाच्या टॉप पॅसेंजर व्हेइकल निर्यात मार्केटमध्ये लॅटिन अमेरिका, आसियान, आफ्रिका, मध्य पूर्व आणि शेजारी राष्ट्राचा समावेश आहे. तर याच्या टॉप ५ एक्सपोर्ट मॉडलमध्ये बलेनो, डिझायर, स्विफ्ट एस प्रेसो आणि ब्रेझाचा समावेश आहे.
9 / 9
ह्युंदाई मोटर इंडियाचे विदेशी डिस्पॅच एप्रिल-डिसेंबर २०२१-२२ दरम्यान १ हजार ५९ यूनिट होते. एका वर्षापूर्वी समान अवधीत ३५ टक्के अधिक होते. याचप्रमाणे किआ इंडियाने समीक्षाधीन अवधीत ग्लोबल मार्केट मध्ये ३४,३४१ यूनिट निर्यात केले तर कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २८,५३८ यूनिटचे निर्यात केले होते.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीHyundaiह्युंदाईKia Motars Carsकिया मोटर्स