शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खरेदीशिवाय बना कारचे मालक, मारूतीकडून सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 9:32 PM

1 / 7
कार खरेदी करणे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु बर्‍याचदा पैशांच्या अभावामुळे लोकांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे मारूती सुझुकी अशा लोकांना खरेदी न करताही कारचे मालक होण्याची संधी देत ​​आहे.
2 / 7
कंपनीने मारुती सुझुकी सबस्क्राइब नावाने एक प्रोग्रॉम सुरू केला आहे. या प्रोग्रॉमअंतर्गत तुम्ही नवीन स्विफ्ट, डिजायर, विटारा ब्रेझा, अर्टिगा, बलेनो, सियाझ आणि एक्सएल 6 साठी 12 महिने, 18 महिने, 24 महिने, 30 महिने, 36 महिने, 42 महिने आणि 48 महिन्यांसाठी सबस्क्राइब घेऊ शकता.
3 / 7
म्हणजेच, तुम्ही या कालावधीत कार आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. कंपनीकडून कार आणि कालावधी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. म्हणजे तुम्ही आपल्या मर्जीनुसार कार घरी घेऊन जाऊ शकता.
4 / 7
या सुविधेअंतर्गत ग्राहकांकडून देखभाल शुल्क आकारला जाणार नाही किंवा विमा खर्चही घेतला जाणार नाही. तसेच, पेमेंट सुद्धा देण्याची आवश्यक नाही. सबस्क्रिप्शनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ग्राहक बायबॅक ऑप्शन सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
5 / 7
तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास आपल्याला सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या डीलरकडे जावे लागेल. तसेच, https://www.marutisuzuki.com/subscribe या वेबसाइटवर भेट देऊन फॉर्म सबमिट करू शकता.
6 / 7
या फॉर्ममध्ये फोन नंबरसह अन्य महत्वाची माहिती तुमच्याकडून घेतली जाईल. यानंतर, कंपनी आपल्याशी संपर्क साधेल. सध्या ही सुविधा बंगळुरू, पुणे, हैदराबाद आणि गुरुग्राममध्ये दिली जात आहे.
7 / 7
मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक (मार्केटिंग अँड सेल्स) शशांक श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, बिझिनेस डायनेमिक्समध्ये अनेक ग्राहक पब्लिक ट्रान्सपोर्टपासून पर्सनल व्हिकलमध्ये शिफ्ट करू इच्छितात. त्यांना असे समाधान हवे असते की पैशाचे ओझे जास्त नसावे. यासाठी ही स्किम सुरू केली गेली आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन