Gravton Quanta Electric Moped Bike: इलेक्ट्रीक स्कूटरचा 'बाप' आला! 80 रुपयांत तीनवेळा मुंबई-पुणे-मुंबई; किंमतही लाखाच्या आत By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 06:15 PM 2021-12-30T18:15:12+5:30 2021-12-30T18:25:06+5:30
Gravton Quanta Electric Moped Bike with Highest Range: डोकं वापरलं! नेक्सॉनपेक्षाही जास्त रेंज देणारी बाईक अशी डिझाईन केली की, तरुणांनाही भुरळ घालेल आणि लोकांचे रेंजचे टेन्शनही दूर करेल. एकीकडे ओलासारख्या बढाया मारणाऱ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कूटरच्या रेंज आणि अन्य गोष्टींची पोलखोल होऊ लागलेली असताना ओला, सिंपल वन पेक्षाही जबरदस्त रेंज असलेल्या स्कूटर लाँच होत आहेत. यामुळे लोकांची मुलभूत गरज, म्हणजे रेंजची समस्या ओळखून या कंपन्यांना आता बाजारात उतरावे लागणार आहे. हैदराबादयेथील स्टार्टअप ग्रेवटनने ३२० किमीची रेंज असलेली इलेक्ट्रीक मोपेड बाजारात आणली आहे.
या इलेक्ट्रीक मोपेडचने नाव ग्रेवटन क्वांटा आहे. ही स्कूटर तरुणांना लक्षात घेऊन तीन आकर्षक रंगांमध्ये आणण्यात आली आहे. यामध्ये रेड, व्हाईट आणि ब्लॅक हे रंग आहेत. या स्कूटरची किंमत ९९००० रुपयांपासून सुरु होत आहे.
जर तुम्हाला ही इलेक्ट्रीक मोपेड खरेदी करायची असेल तर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बुकिंग करू शकता. किंवा जवळच्या डीलरशीपकडे जाऊन बुक करू शकता.
इलेक्ट्रिक मोपेडची बॅटकी आणि पावर: यामध्ये ३ किलोवॉटची लिथिअम आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. तसेच तीन किलोवॉटचे बीएलडीसी मोचर देण्यात आली आहे.
चार्जिंग वेगवान बॅटरी चार्जिंगवर कंपनीने दावा केला आहे की, याची बॅटरी फास्ट चार्जरद्वारे ९० मिनिटांत फुल चार्ज होते. तर नॉर्मल चार्जवर ही बॅटरी तीन तासांचा वेळ घेते.
कंपनीनुसार ही इलेक्ट्रीक मोपेड रिब केज चेसिसवर बनविण्यात आली आहे. यामुळे यात दोन बॅटरी आरामात बसतात. हे या मोपेडच्या सर्वाधिक रेंजचे वैशिष्ट आहे.
रेंज दुप्पट पहिली बॅटरी चार्ज केली तर ही मोपेड १५० किमीची रेंज देते. परंतू, दोन्ही बॅटरी फुल चार्ज केल्या तर कंपनीने हीच रेंज ३२० किमी देत असल्याचा दावा केला आहे.
इलेक्ट्रिक मोपेडमध्ये फ्रंट आणि रिअर अशा दोन्ही चाकांना सीबीएस स्टँडर्डचे डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. हे सध्याच्या काळातील सुरक्षित ब्रेक आहेत.
खराब रस्त्यांवर चांगले सस्पेंशन मिळावे यासाठी फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे ट्विन रिअर शॉक ऑब्झर्वर दिले आहेत. या मोपेडची सुरुवातीची किंमत ९९००० रुपये जरी असली तरी केंद्र आणि राज्याची सबसिडी ही किंमत खूप कमी करणार आहे.