Ola Electric Scooter : दिवाळीनंतर Ola इलेक्ट्रिक स्कूटर टेस्ट राइडसाठी सज्ज असणार, कंपनीकडून घोषणा By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 05:51 PM 2021-10-20T17:51:49+5:30 2021-10-20T18:16:08+5:30
Ola Electric Scooter :चेन्नईस्थित इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता ओला कंपनीने घोषणा केली आहे की, दिवाळीनंतर आपल्या ग्राहकांना एस 1 आणि एस 1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राइड ऑफर करण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल. पण खरेदी करण्यापूर्वी तुम्ही एक टेस्ट राइड घ्यायची असेल तर तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. चेन्नईस्थित इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता ओला कंपनीने घोषणा केली आहे की, दिवाळीनंतर आपल्या ग्राहकांना एस 1 आणि एस 1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राइड ऑफर करण्यासाठी तयार आहे. तसेच, 10 नोव्हेंबरपासून इलेक्ट्रिक स्कूटर टेस्ट राइडसाठी उपलब्ध असतील, असे कंपनीने म्हटले आहे.
बुकिंगचा दुसरा टप्पा ओला इलेक्ट्रिकने आपल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर एस 1 आणि एस 1 प्रो या 15 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात 1 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर लाँच झाल्यानंतर एक महिन्यानंतर ओला इलेक्ट्रिकने दोन दिवसांसाठी त्यांची बुकिंग उघडली. कंपनीने सांगितले की, त्याने केवळ दोन दिवसांत 1,100 कोटी रुपयांहून अधिकचा ऑनलाइन व्यवसाय केला आहे. कंपनीला पहिल्या 24 तासातच 600 कोटी रुपयांचे बुकिंग मिळाले होते. आता या स्कूटरच्या बुकिंगचा दुसरा टप्पा दिवाळीच्या आधी म्हणजे 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
ड्रायव्हिंग रेंज आणि स्पीड ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे एस 1 व्हेरिएंट एकदा फुल चार्जिंग केल्यानंतर 121 किलोमीटर अंतर कापू शकते. तर एस 1 प्रो व्हेरिएंट एकदा फुल चार्जिंग केल्यानंतर 181 किमी पर्यंत अंतर कापू शकतो. एस 1 व्हेरिएंट 3.6 सेकंदात 0 ते 40 किमी प्रति तास वेग पकडते. तर एस 1 प्रो व्हेरिएंट 3 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते. त्याचबरोबर या स्कूटरची टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे.
बॅटरी आणि चार्जिंग ओला एस 1 प्रोमध्ये 3.97 kWh ची खूप मोठी बॅटरी क्षमता देण्यात आली आहे. ओला एस 1 प्रोची बॅटरी उच्च क्षमतेची युनिट असल्याने पूर्ण चार्ज होण्यास जास्त वेळ लागतो. पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 तास 30 मिनिटे लागतात. ओला इलेक्ट्रिकचा दावा आहे की, एस 1 प्रो ची बॅटरी फक्त 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकते आणि 75 किमीच्या ड्रायव्हिंग रेंजला पुरेशी असावी.
कलर ऑप्शन ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कलर निवडण्यासाठी एकूण 10 ऑप्शन आहेत. बुकिंग दरम्यान पसंतीचा कलर निवडला जाऊ शकतो आणि कंपनीच्या वेबसाइटनुसार, ग्राहकाला हवे असल्यास स्कूटरचा कलर ऑप्शन नंतर बदलता येतो.
किती आहे किंमत? ओला इलेक्ट्रिकने या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती आधीच जाहीर केल्या आहेत. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या एस 1 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. तर एस 1 प्रो व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1,29,999 रुपये आहे.
किती असेल ईएमआय? ओला इलेक्ट्रिकने 7 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एस 1 स्कूटर 2,999 रुपये प्रति महिना समान मासिक हप्त्यावर (ईएमआय) उपलब्ध होईल. त्याच वेळी, या इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस 1 प्रोच्या अॅडव्हान्स व्हर्जनसाठी ईएमआय 3,199 रुपयांपासून सुरू होईल.
फायनान्सचा ऑप्शन ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच आपल्या ग्राहकांना कर्ज मिळण्यासाठी एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), कोटक महिंद्रा प्राइम (Kotak Mahindra Prime) आणि टाटा कॅपिटल (TATA Capital) यासह विविध अग्रणी बँकांसोबत भागिदारी केली आहे. तसेच, ओलाने ज्या इतर बँकांशी करार केला आहे, त्यामध्ये बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), अॅक्सिस बँक (Axis Bank), आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank), इंडसइंड बँक (IndusInd Bank), एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank) जन स्मॉल फायनान्स बँक (Jana Small Finance Bank) आणि येस बँक ( YES Bank) यांचा समावेश आहे.
कर्ज पाहिजे असेल तर... एचडीएफसी बँक ओला आणि ओला इलेक्ट्रिक अॅपवर पात्र ग्राहकांना काही मिनिटांत पूर्व-मंजूर कर्ज प्रदान करेल. ओला कंपनीकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टाटा कॅपिटल आणि आयडीएफसी फर्स्ट बँक डिजिटल केवायसीवर प्रक्रिया करेल आणि पात्र ग्राहकांना त्वरित कर्ज मंजुरी देईल. जर तुम्हाला फायनान्सची गरज नसेल, तर तुम्ही ओला एस 1 साठी 20,000 रुपये किंवा ओला एस 1 प्रोसाठी 25,000 रुपये अॅडव्हान्स पेमेंट करू शकता आणि उर्वरित रक्कम ज्यावेळी कंपनी तुमच्या स्कूटरची इनवॉइस देईल, त्यावेळी भरू शकता.
कंपनीत महिलांना रोजगार ओला स्कूटर कंपनीच्या तामिळनाडूतील फ्यूचर फॅक्टरीमध्ये तयार केले जात आहेत. निर्मितीचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला आहे. पूर्ण क्षमतेसह, एकदा पूर्णपणे तयार झाल्यावर, प्लांट दरवर्षी 10 मिलियन (एक कोटी) युनिट तयार करेल. ओलाचे सहसंस्थापक भविश अग्रवाल यांनी सांगितले की, ओलाची फॅक्टरी पूर्णपणे महिला चालवतील. ते म्हणाले की, या फॅक्टरीत 10 हजारांहून अधिक महिलांना रोजगाराची संधी मिळेल.