Only Rs 186 per day installment; can buy Maruti Suzuki Alto in budget
केवळ १८६ रुपयांचा दिवसाला हप्ता; दोन मिनिटांत पहा Maruti Suzuki Alto चे गणित By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 12:23 PM1 / 10Maruti Suzuki Alto (मारुती सुजुकी अल्टो) देशातील सर्वात मोठ्या खपाची कार आहे. या कारने २० वर्ष पूर्ण केली आहेत. या काळात अनेकदा बेस्ट सेलिंग कारचा पुरस्कार मिळाला आहे. 2 / 10मारुतीच्या अल्टोची एक्स शोरुम किंमत ३ लाख रुपयांपासून सुरु होते. तरीही तुमचे बजेट कमी असेल तर ही बातमी तुमच्या कामी येऊ शकते अन् तुमचे कारचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. 3 / 10मारुतीची अल्टो कार दिवसाला केवळ १८५.५ रुपयांचा हप्ता देऊन खरेदी केली जाऊ शकते. जाणून घ्या याचा हिशेब. 4 / 10Maruti Suzuki Alto चे बेस व्हेरिअंट दिल्लीमध्ये 2,94,800 रुपये आहे. दिल्ली ऑनरोड किंमत 3,24,460 रुपये आहे. यात आरटीओ, इन्शुरन्सची रक्कम आहे. 5 / 10जर ५०००० रुपये डाऊनपेमेंट केले तर 274460 रुपये लोन घ्यावे लागेल. एसबीआयकडून लोन घेतले तर ८ टक्के व्याजदर आहे. 6 / 10५ वर्षांच्या कालावधीसाठी लोन घेतले तर महिन्याला 5,565 ईएमआय बसतो. अशाप्रकारे महिन्याच्या दिवसांचा हिशेब घातल्यास दिवसाला 185.5 रुपयांचा हप्ता बसणार आहे. 7 / 10मारुती सुझुकी अल्टो ही छोटी असली तरीही स्टायलिश लुक आणि चांगले इंजिन म्हणून पसंत केली जाते. शिवाय २२.०५ किमी प्रति लीटरचे मायलेजही दिले जाते. 8 / 10महत्वाचे म्हणजे शहरात ही छोटी कार फार उपयुक्त आहे. सीएनजी व्हेरिअंट 31.59 किलोमीटर प्रति किलोग्रामचे मायलेज देते. 9 / 10अल्टोमध्ये 796 सीसी, 3-सिलिंडर, 12-व्हॉल्व, BS-6 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ६००० आरपीएमवर 48PS ची अधिकतर ताकद प्रदान करते. तर 3500 आरपीएम वर 69Nm चा पीक टॉर्क देते. याचे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचे आहे. 10 / 10अल्टोमध्ये पुढे डिस्क ब्रेक आहे. तर मागे ड्रम ब्रेक दिला आहे. पुढे MacPherson Strut सस्पेन्शन दिले आहे, तर मागे 3-लिंक रिजिड एक्सेल सस्पेंशन देण्यात आले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications