Petrol-Diesel च्या वाढत्या किंमतींमध्ये 'या' Cars देतील दिलासा; पाहा बेस्ट मायलेज देणाऱ्या गाड्या By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 04:04 PM 2021-10-22T16:04:32+5:30 2021-10-22T17:07:35+5:30
सध्या Petrol-Diesel च्या किंमती सातत्यानं वाढत आहेत. अशा परिस्थिती आता लोकांचा कल अधिक मायलेज असणाऱ्या गाड्यांकडे किंवा अन्य पर्यायांकडे दिसून येत आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel) दर सातत्याने गगनाला भिडत आहेत. बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरानं शतकाचा टप्पा पार केला आहे. अशा परिस्थितीत लोकांची चिंता सातत्याने वाढत आहे. कार चालवणाऱ्यांपुढे तर मोठ्या प्रमाणात समस्या उभी ठाकली आहे. यापूर्वी सेडान कारमध्ये सामान्यत: 2,200 ते 2,400 रुपयांमध्ये टाकी फुल होत होती. परंतु आता त्यासाठी ग्राहकांना जवळपास 1000 रूपये अधिक म्हणजेच ग्राहकांना 3,300 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींदरम्यान ऑटोमोबाईल कंपन्यांनाही आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांकडूनही आता मोठ्या प्रमाणात अशाच वाहनांची निवड केली जात आहे, जी अधिक मायलेजही देतात. जर तुम्हाला देखील सर्वोत्तम मायलेज असलेली कार निवडायची असेल तर आज आम्ही तुम्हाला या सेगमेंटच्या सर्व विभागातील सर्वोत्तम मायलेज कारबद्दल सांगणार आहोत.
एन्ट्री लेव्हल हॅचबॅक सेगमेंट: Hyundai Grand i10 Nios : कमी किंमतीत उत्तम मायलेजवाल्या कार्ससाठी हे सेगमेंट भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. ह्युंदाईच्या Grand i10 Nios चे डिझेल व्हेरिएंट या सेगमेंटमध्ये सर्वोत्तम आहे. जरी या विभागातील बहुतेक वाहने फक्त पेट्रोल इंजिनसह येतात, परंतु ही ह्युंदाई कार डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. ही कार 25.49 kmpl पर्यंत मायलेज देते.
दुसरीकडे, जर तुम्ही पेट्रोल कारचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकी स्विफ्ट हा एक चांगला पर्याय आहे, ही कार 23.76 किमी / लीटर पर्यंत मायलेज देते.
प्रिमिअम हॅचबॅक सेगमेंट Hyundai i20: प्रीमियम कारच्या बाबतीत, ह्युंदाई i20 खूप लोकप्रिय आहे. या कारचे इंजिन आणि इतर मेकॅनिझम एंट्री लेव्हल हॅचबॅक सारखीच आहेत. जरी ही कार आकाराने मोठी आहे आणि अनेक अॅडव्हान्स्ड फीचर्स त्यात समाविष्ट केली गेली आहेत, ज्यामुळे ती आणखी चांगली बनते. रिपोर्ट्सनुसार, या कारचे डिझेल व्हेरिएंट 25.2 kmpl पर्यंत मायलेज देते.
दुसरीकडे, जर आपण या सेगमेंटमध्ये पेट्रोल कार बाबत पाहिले तर मारुती बलेनो हा एक चांगला पर्याय आहे, जो 23.87 किमी / लीटर मायलेज देतो.
मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) सेगमेंट: Datsun Go+ : सध्या अधिक सिटींग कॅपेसिटी आणि उत्तम स्पेसच्या मोठी एमपीव्ही कार्सचीही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या सेगमेंटमध्ये मारुती अर्टिगा पासून ट्रायबर आणि डॅटसन गो प्लस पर्यंत अनेक मॉडेल्स समाविष्ट आहेत. परंतु मायलेजच्या बाबतीत डॅटसन गो+ सर्वोत्तम आहे. ही
ही 7 सीटर कार 19 kmpl पर्यंत मायलेज देते. डॅटसन गो प्लस मध्ये कंपनीने 1.2 लिटर क्षमतेचे 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन वापरले आहे. त्याचे मॅन्युअल व्हेरिएंट 68PS ची पॉवर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंट 77PS ची पॉवर आणि 104Nm चा टॉर्क जनरेट करते.
कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंट: Hyundai Aura: गेल्या काही वर्षांत, कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंट देशात अधिकाधिक लोकप्रिय झाला आहे. जरी मारुती डिझायर या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार आहे, परंतु मायलेजच्या बाबतीत ह्युंदाई ऑरा सर्वोत्तम आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह येते.
त्याच्या डिझेल व्हेरिअंटमध्ये 1.2bhp/190Nm सह 1.2 लिटर डिझेल इंजिन आहे. एकूण 6 वेगवेगळ्या रंगांमध्ये येत असलेल्या ऑरा सेडानमध्ये कंपनीने 8-इंच टचस्क्रीन सिस्टमसह अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये दिली आहेत. त्याचे डिझेल व्हेरिएंट 25.4 kmpl पर्यंत मायलेज देते.
कॉम्पॅक्ट एसयूवी सेगमेंट: Kia Sonet: कमी खर्चात स्पोर्टी फीलसह ड्रायव्हिंग परफॉर्मन्ससाठी ओळखलं जाणारं कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. या सेगमेंटमध्ये अनेक मॉडेल्स उपलब्ध असले, तरी नुकत्याच लॉन्च झालेल्या टाटा पंचपासून मारुती ब्रेझा, ह्युंदाई वेन्यू, किया सोनेटपर्यंत अनेक गाड्यांचा यात समावेश आहे.
पण मायलेजच्या बाबतीत किआ सोनेटचे नाव सर्वात वर येतं. या छोट्या SUV मध्ये अॅडव्हान्स्ड फीचर्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किआ सोनेटचे डिझेल व्हेरिएंट 24.1 किमी / लीटर पर्यंत मायलेज देते. यात देण्यात आलेली माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. मालयेज हे रोडची स्थिती आणि चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे.