Police are not authorized to take out your vehicle keys you must know about the traffic rules
Traffic Rules: ट्रॅफिक पोलिसाला कारची चावी काढण्याचा अधिकार आहे? तुम्हाला माहीत असायलाच हवेत हे 7 नियम, लगेच जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 10:50 AM1 / 9रस्त्यावर गाडी चालवत असताना आपल्याला अनेक वेळा ट्रॅफिक पोलीस अडवतात. मात्र, आपण नियमांचे काटेकोरपणे पालन करत असू तर आपल्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही. मात्र, भारतात पोलिसांच्या गैरवर्तनाची अनेक उदारहणे आपण ऐकतो अथवा पाहतो. अशा परिस्थितीत एक वाहनचालक म्हणून आपल्याला आपले अधिकार माहीत असायलाच हवेत. आज आम्ही आपल्याला वाहनांची चावी काढण्यापासून ते इतरही काही आवश्यक नियमांसंदर्भात माहिती देणार आहोत.2 / 9हे डॉक्यूमेन्ट्स नक्की सोबत ठेवा - काही आवश्यक कागदपत्रे आपण नेहमीच वाहन चालवताना सोबत ठेवायला हवीत. जसे, Registration certificate (आरसी), Pollution under control (पीयूसी), Insurance document आणि Driving licence.3 / 9हे नियम आपल्याला माहित असायलाच हवेत - 1. वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने नेहमीच गणवेशात असायला हवे. युनिफॉर्मवर बक्कल नंबर आणि त्यांचे नाव असावे. ते गणवेशात नसतील तर तुम्ही पोलीस कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र विचारू शकता. जर त्यांनी ते दाखविण्यास नकार दिला, तर आपणही आपले डॉक्यूमेंट्स दाखविण्यास नकार देऊ शकता.4 / 92. जर आपल्याकडे त्या क्षणी दंडाचे पैसे भरण्यासाठी पैसे नसतील, तर आपण ते नंतरही भरू शकता. अशा स्थितीत न्यायालय चालान जारी करते, तेही न्यायालयात जाऊन भरावे लागेल. या काळात वाहतूक अधिकारी आपले ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे ठेवू शकतात.5 / 93. आपले चालान कापण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे चालान बुक अथवा ई-चलान मशीन असणे आवश्यक आहे. जर यांपैकी काहीच नसेल तर आपले चालान कापले जाऊ शकत नाही. मात्र, तरीही तुम्ही पोलिसाला पैसे देत असाल तर, आपण एक प्रकारे लाचच देत आहात. 6 / 94. जर ट्रॅफिक पोलिसाने आपले कुठलेही कागदपत्र जप्त करण्याचा निर्णय घेतला असेल अथवा जप्त करत असेल, तर त्याची पावतीही मागून घ्या. 7 / 95. एक पोलीस अधिकारी आपल्या परवानगीशिवाय आपल्या कारची चावी घेऊन जाऊ शकत नाही. जर ट्रॅफिक पोलीस तुमच्या गाडीची चावी काढून घेत असेल, तर तुम्ही त्या घटनेचा व्हिडीओ बनवू शकता. हा व्हिडीओ तुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यास दाखवून तक्रारही करू शकता.8 / 96. जर आपण आपल्या गाडीत बसलेले असाल, तर ट्रॅफिक पोलीस आपले वाहन टो करू शकत नाही.9 / 97. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत, सर्व वाहन चालकांकडे त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. कलम १८३, १८४ आणि १८५ अंतर्गत वाहनाची वेगमर्यादा योग्य असणे आवश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे इत्यादी कलमांतर्गत दंड आणि शिक्षेची तरतूदही आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications