ही आहे भारतातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार; फिचर्सही दमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 01:23 PM2019-10-06T13:23:46+5:302019-10-06T13:27:09+5:30

रेनॉल्ट ट्राइबर ही सात सीटर कार लाँच केली आहे. चार व्हेरिअंटमध्ये ही कार उपलब्ध होणार आहे.

कारची लांबी 3990mm असून रुंदी 1739 मिमी आहे. 182 मिमीचा ग्राऊंड क्लिअरंस आहे. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या सीटवर एसी व्हेंट्स देण्यात आले आहे. 40 लीटरची इंधन क्षमता आहे.

8 इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. रेनॉल्ट ट्राइबरमध्ये 1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले असून चार एअरबॅगही देण्यात आल्या आहेत.

Load Limiter + Pretensioner, एबीएस, ईबीडी, स्पीड अलर्ट वार्निंग, रिअर पार्किंग सेन्सर, पादचारी सुरक्षा असे फिचर्स देण्यात आले आहेत.

भारतीय बाजारात असलेली 7 सीटर कारमध्ये ही कार स्वस्त पर्याय असून किंमत 4.95 लाखांपासून सुरू होते. आरएक्सई(RXE), आरएक्सएल( RXL), आरएक्सटी (RXT) ,आरएक्सझेड ( RXZ ) असे चार व्हेरिअंट आहेत.

ट्रायबरला पाच रंगांत बाजारात आणण्यात आले आहे. मेटल मस्टर्ड, इलेक्ट्रीक ब्ल्यू, फेयरी रेड, मून लाईट सिल्व्हर आणि आईस स्कूल व्हाईट सारखे रंग आहेत.