Range of 250KMS in full charge New electric bike komaki will launch soon know details
फुल चार्जमध्ये 250KMS ची रेंज; येतेय नवी Electric Bike; लाँचपूर्वीच पाहा झलक By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 1:11 PM1 / 9कोमाकी रेंजर इलेक्ट्रीक क्रूझर (Komaki Ranger Electric cruiser) असे या बाईकचे नाव आहे. बाईकमध्ये उत्तम रेंजसह अनेक उत्तमोत्तम फीचर्स देण्यात येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. लॉन्च होण्यापूर्वीच या बाईकची झलक समोर आली आहे.2 / 9रिपोर्ट्सनुसार, कोमाकी रेंजर इलेक्ट्रीक क्रूझर बाईक सिंगल चार्जवर 180 किमी ते 250 किमीची रेंज देईल असं म्हटलं जात आहे. याचा अर्थ एवढ्या लांब पल्ल्याची ही भारतातील पहिली इलेक्ट्रीक दुचाकी असेल. यात रुंद टायर आणि काळ्या अलॉय व्हीलसह ड्युअल डिस्क ब्रेक मिळू शकतात.3 / 9कोमाकी रेंजरला गोल एलईडी हेडलॅम्प्स मिळतील, जे बाइकला रेट्रो लुक देईल. याशिवाय साईड इंडिकेटर्सही राऊंड शेपच आहेत.4 / 9याचे रुंद हँडलबार तुम्हाला क्रूझर राईडचा अनुभव देतील. याशिवाय, क्रूझर इलेक्ट्रीक बाईकमध्ये क्रूझ कंट्रोल, रिपेअर स्विच, रिव्हर्स स्विच, ब्लूटूथ आणि अॅडव्हान्स्ड ब्रेकिंग सिस्टम यांसारखी फीचर्स मिळतील.5 / 9या बाईकचं टेललाइट आपल्याला बजाज अॅव्हेंजरची आठवण करून देते, परंतु विशेष बाब म्हणजे यात बनावट एक्झॉस्ट मिळतो. तुम्हाला पेट्रोल क्रूझर सारखी अनुभूती देण्यासाठी, यात स्पीकरही देण्यात येऊ शकतो. यापूर्वी Revolt rv400 मध्ये हे देण्यात आलं होतं.6 / 9कोमाकी रेंजर नावाची, ही इलेक्ट्रीक बाईक टिपिकल क्रूझर डिझाइनवर तयार करण्यात आली आहे, जी दिसायला खूपच सुंदर आहे आणि बदललेल्या बजाज अॅव्हेंजरसारखी दिसते.7 / 9रायडर सीट खालच्या भागात आहे, तर मागच्या प्रवाशाच्या आरामदायी प्रवासासाठी, मागच्या सीटवर बॅकरेस्ट बसवण्यात आला आहे. मोटरसायकलच्या दोन्ही बाजूस असलेले कठीण पेनियर्स हे स्पष्ट करतात की, ती लांब अंतर कापण्यासाठी बांधलेली आहे. 8 / 9कोमाकीने आधीच माहिती दिली आहे की, रेंजर इलेक्ट्रिक क्रूझर 4 kWh बॅटरी पॅकसह येईल, जी 5,000 वॅट मोटरसह येईल. रेंजर ईव्ही एका चार्जमध्ये 250 किमीपर्यंत चालवता येऊ शकते, असा दावाही कंपनीने केला आहे. 9 / 9कोमाकी रेंजरमध्ये 5000 वॉटची एक मोटर असेल, तसेच कठिण रस्त्यांवरही ही इलेक्ट्रीक बाईक चांगला परफॉर्मन्स देईल असे कंपनीने म्हटले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications