Tata Motors Cars History: टाटा मोटर्सने लाँच केलेली पहिली कार कोणती? सफारी, सुमो की दुसरीच... By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 01:26 PM 2021-12-28T13:26:00+5:30 2021-12-28T13:33:46+5:30
Tata Motors Cars History on Ratan Tata's Birthday: आता टाटाच्या भात्यात एकसोएक प्रवाशांना सुरक्षा देणाऱ्या कार आहेत. पण तुम्हाला माहितीये का टाटा मोटर्सची पहिली कार कोणती होती, रतन टाटांनी त्यासाठी किती आणि काय काय संघर्ष केला....चला जाणून घेऊया. टाटा मोटर्सची घोडदौड आज लोकांना दिसत असली तरी इतिहास खूप संघर्षमयी आहे. फार नाही, पण काही म्हणजेच तीन-चार वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने कार बनवू नये, ट्रक, टेम्पोच बनावेत असे अनेकजण म्हणत असायचे. परंतू आज देशाला सर्वात पहिली फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगची कार देणारी हीच कंपनी आहे.
आता टाटाच्या भात्यात एकसोएक प्रवाशांना सुरक्षा देणाऱ्या कार आहेत. पण तुम्हाला माहितीये का टाटा मोटर्सची पहिली कार कोणती होती, रतन टाटांनी त्यासाठी किती आणि काय काय संघर्ष केला....चला जाणून घेऊया.
1945 मध्ये टेल्कोची स्थापना झाली, यानंतर मर्सिडीज बेंझसोबत करार करून 1954 मध्ये पहिले कमर्शिअल व्हेईकल आणि लॉरी लाँच झाली. मात्र, पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये टाटाला येण्यास 37 वर्षांचा काळ जावा लागला. 1991 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा मोटर्सची पहिली कार भारताच्या रस्त्यांवर आणली. यानंतर जे झाले ते आज जग मानते.
1991 मध्ये लाँच झालेली सिएरा कार लोकांमध्ये कुतुहलाचा विषय बनली. कारण टाटाची ही पहिली कार होती. त्या काळात कार खरेदी करणाऱ्यांची संख्या एवढी नव्हती. परंतू स्वदेशी एसयुव्हीचे चाहते एवढे होते, की विचारही करायला नको. ही पूर्णपणे स्वदेशी कार होती. या कारचे इंजिन ते इंजिनिअरिंग सारे काही भारतीयांनी तयार केलेले होते.
टाटा मोटर्सची लोकप्रियता त्यावेळी वाढली, जेव्हा कंपनीने 1998 मध्ये पाच सीटर फॅमिली कार टाटा इंडिका लाँच केली. इंडिकाची एवढी विक्री झाली की ज्याच्या त्याच्या घरी एकतर मारुती किंवा इंडिका दिसायला लागली. परंतू मारुतीने तेव्हाच अल्टो लाँच केली आणि लोक तिकडे वळू लागले. 1992 मध्ये टाटाने इस्टेट नावाची कार आणली.
मारुतीचा इतिहास तर सर्वांना माहिती आहे. नसेल तर त्याची लिंक फेसबुकच्या कमेंटमध्ये दिली जाईल. तेव्हा मारुती ही तुफान फॉर्ममध्ये आली होती. आजही आहे, परंतू तेव्हा मारुती 800 ही कार तुफान विकली जात होती. अॅम्बॅसिडर, फोर्डच्या कार रस्त्यावर धावत होत्या. त्याचवेळी रतन टाटांनी टाटा सिएरा लाँच केली.
पण त्याचवेळी टाटाने आणखी एक एसयुव्ही लाँच केली होती ती म्हणजे टाटा सफारी. या कारच्या लूक आणि ताकदीची लोक आजही चर्चा करतात. तसेच त्यानंतर टाटा सुमोदेखील तुफान खपली.
टाटांचे एक स्वप्न भंगले... रतन टाटांना सामान्य लोकांसाठी देखील कार तयार करायची होती. एक लाखातील कार नॅनो. २००८ चे वर्ष होते. टाटा मोटर्सने रतन टाटांची ड्रीम कार टाटा नॅनो लाँच केली. पण तिची किंमती जास्त होती. ही कार एवढी विकली गेली नाही, जेवढी टाटांना अपेक्षा होती. हा प्रोजेक्ट फेल गेला. गेल्या वर्षी शेवटची नॅनो कार तयार झाली.
यानंतर टाटांनी आपली रणनितीच बदलली. फोर्डकडून विकत घेतलेल्या कंपनीचा फायदा घेतला आणि नवीन लूक, फिचर्स असलेल्या एकसोएक सुरक्षित कार लाँच केल्या. गेल्या चार वर्षांत टाटांना तुफान प्रतिसाद मिळाला, कंपनीचे आणखी एक सुवर्ण युग सुरु झाले.