Tata Nexon EV available on monthly subscription starting at 41 thousand
१५ लाखाची नवीकोरी कार टाटा कंपनी ग्राहकांना भाड्याने देणार; ३६ महिने चालवा अन् परत द्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 10:52 PM1 / 8टाटाची १५ लाखाहून अधिक किंमतीची ही कार आपण भाड्याने घेऊ शकता. कंपनी स्वतः ग्राहकांना कार भाड्याने देत आहे. वास्तविक, टाटा मोटर्सने आपल्या इलेक्ट्रिक कार Nexon EV (नेक्सन इलेक्ट्रिक वाहन) सब्सक्रिप्शन योजना सुरू केली आहे.2 / 8कंपनीचे म्हणणे आहे की, या ग्राहकांसाठी ही एक फायदेशीर योजना आहे, जे काही काळ शहरात राहतील आणि त्यांना कारची आवश्यकता असेल, परंतु त्यांना इतक्या कमी काळासाठी कार खरेदी करण्याची इच्छा नाही3 / 8कंपनीने सध्या १८ महिने, २४ महिने आणि ३६ महिन्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. जर ग्राहकांना टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कार १८ महिन्यांसाठी भाड्याने घ्यायची असेल तर त्यांना दरमहा ४७ हजार ९०० रुपये द्यावे लागतील.4 / 8२४ महिन्यांच्या योजनेसाठी दरमहा ४४ हजार ९०० रुपये भाडे द्यावे लागेल. तर ३६ महिन्यांसाठी तुम्हाला सबस्क्रिप्शनवर दरमहा ४१ हजार ९०० रुपये द्यावे लागतील. सबस्क्रिप्शन समाप्त झाल्यानंतर, ग्राहक एकतर आपली योजना वाढवू शकतात किंवा कार कंपनीकडे परत देऊ शकतात.5 / 8तसेच या सबस्क्रिप्शन योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक कारची मागणी वाढेल. यासाठी टाटाने ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लिमिटेडबरोबर भागीदारी केली आहे. दरमहा भाडे वगळता ग्राहकाला इतर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. त्यांनी कार चार्ज करावी आणि चालवावी6 / 8एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही टाटा कार ३१२ किमी धावू शकते. यात ३०.२ किलोवॅट क्षमतेची लिथियम आयन बॅटरी आहे. त्याची बॅटरी ८ तासात पूर्णपणे चार्ज केली जाते. तर ८० टक्के बॅटरी वेगवान चार्जरद्वारे ६० मिनिटांत चार्ज केली जाते.7 / 8वेगाबाबत बोलल्यास, ईव्ही फक्त ९.९ सेकंदात ०-१०० किमी वेग पकडू शकते. दिल्लीतील टाटा नेक्सन ईव्हीची एक्स-शोरूम किंमत १३.९९ लाख रुपये आहे, तर ऑन रोड किंमत १५ लाख ६३ हजार ९९७ रुपये आहे. टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १५.९९ लाख रुपये आहे.8 / 8टाटा मोटर्सची ही खास सबक्रिप्शन योजना सध्या देशातील मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहे. यात दिल्ली / एनसीआर, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बंगळुरूचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications