Tata Punch SUV Unveil Updates Price Bookings Variants and More Details
Tata Punch SUV आली हो! २१ हजार रुपयांत करा बुकिंग, जाणून घ्या जबरदस्त फिचर्स... By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 1:38 PM1 / 10टाटा कंपनीनं आपली बहुप्रतिक्षीत टाटा पंच मायक्रो एसयूव्ही कार भारतात लाँच केली आहे. जबरदस्त लूक आणि फिचर्समुळं या कारनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एकूण चार व्हेरिअंटमध्ये ही कार सध्या बाजारात उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 2 / 10टाटा पंच कारचं प्री-बुकिंग आजपासून सुरू झालं असून ऑनलाइन पद्धतीनं कारचं बुकिंग करता येणार आहे. अवघ्या २१ हजार रुपयांमध्ये तुम्हीला तुमची टाटा पंच मायक्रो एसयूव्ही कार बुक करता येणार आहे. 3 / 10टाटा पंच कार एमएमटी ट्रान्समिशनच्या पर्यायातही उपलब्ध होणार आहे. ज्यांना ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार चालवण्याची आवड आहे. त्यांच्यासाठी एमएमटी ट्रान्समिशन पर्यायातील टाटा पंच कार उत्तम पर्याय ठरणार आहे. 4 / 10 टाटा पंच कार टाटाच्या टियाओ कारपेक्षा मोठी असणार आहे. टाटा पंच मायक्रो एसयूव्ही कारसाठीचं बुकिंग आजपासून सुरू झालं असलं तर येत्या २० ऑक्टोबर रोजी कारची सविस्तर किंमत कंपनीकडून जारी करण्यात येणार आहे. तरी कारची किंमत ५ ते ८ लाखांच्या आत असणार असल्याची दाट शक्यता आहे.5 / 10 टाटा पंच कारमध्ये नेमकं कोणकोणते फिचर्स आणि कार नेमकी कशी असणार याची अधिकृत माहिती कंपनीनं आज जारी केली आहे. यात टाटा पंचमध्ये एबीएस सिस्टम, ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोलची सुविधा असणार आहे. याशिवाय टाटा पंचमध्ये दोन एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. 6 / 10टाटा मोटर्नं आज जाहीर केलेल्या माहितीनुसार कारच्या इंजिनमध्ये Ram-Air Technology चा वापर केला आहे. यामुळे कार टॉप स्पीडवर खूप चांगलं मायलेज देऊ शकेल. टाटा पंचमध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. कार ०-६० किमीपर्यंतचा स्पीड अवघ्या ६.५ सेकंदात गाठते. तर १०० किमी प्रतितास इतका वेग अवघ्या १६.५ सेकंदात गाठेल. 7 / 10टाटा पंचमध्ये इंटेरिअर देखील आकर्षक असणार आहे. यात ७ इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलं आहे. यात अनेक फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 8 / 10टाटा पंच मायक्रो एसयूव्हीला १६ इंचाचे टायर्स आणि तब्बल १८७ एमएम ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे. तर कारचे चारही दरवाचे ९० अंशापर्यंत उघडणारे असणार आहेत. जेणेकरुन कारमध्ये सहजपणे प्रवेश करता येईल. 9 / 10एकूण चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या टाटा पंच कारच्या टॉप व्हेरिअंट म्हणजेच Creative Persona व्हेरिअंटमध्ये सर्व अद्ययावत फिचर्स देण्यात आले आहेत. 10 / 10तर बेसिक व्हेरिअंटमध्ये म्हणजेच Pure Persona व्हेरिअंटमध्ये ७ ऐवजी ४ इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टम असणार आहे. दोन एअरबॅग्ज, इंजिन स्टार्ट-स्टॉप सिस्टम, एबीएस-ईबीडी सिस्टम मिळणार आहे. पण या व्हेरिअंटमध्ये टायर्स अलॉय व्हिल्स नसतील. आणखी वाचा Subscribe to Notifications