शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ठाणेकरांना घडलं विंटेज कारचं दर्शन, जवळपास 40 गाड्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 11:04 PM

1 / 10
चर्चगेट ते ठाणे आणि ठाणे शहरातील काही मार्गांवरून या सुमारे 100 वर्षे जुन्या मोटारगाड्या धावताना पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
2 / 10
विंटेज अ‍ॅन्ड क्लासिक कार फेडरेशन ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल व्हेईकल अ‍ॅन्सिनस, रेमंड तसेच ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या या विंटेज कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
3 / 10
ठाणे शहरात आनंदनगर चेकनाका येथून सकाळी 11.30 वाजता रॅलीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह रेमंडचे मालक गौतम सिंघानिया, विवेक गोएंका, विंटेज कारचे संग्राहक अनिल भिंगार्डे, नितीन ढोसा आदींचा या रॅलीमध्ये विशेष सहभाग होता.
4 / 10
ठाण्यातील रस्त्यांवरून मार्गक्रमण करणा-या या मोटारगाड्यांसाठी हौशींसह अनेकांनी त्या पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
5 / 10
यामध्ये 1886 ते अगदी 1989 पर्यंतच्या 40 गाड्या आणि 27 मोटारसायकल तसेच स्कूटर आणि त्यांच्या संग्रहकांचा सहभाग होता. गौतम सिंघानिया यांच्याकडे 1937ची हडसन आणि 1938ची ब्यूक फॅदम पाहायला मिळाली.
6 / 10
तसेच रॉनी व्हेसूना यांची 1957ची फियाट 1100, नितीन ढोसा यांची एल्विस, विवेक गोएंका यांची 1936ची फोर्ड यांच्या गाड्यांचंही दर्शन घडलं.
7 / 10
यश रुईया यांची 1896ची मर्सिडीज बेंझ आणि 1886च्या कार पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती.
8 / 10
याशिवाय दुस-या महायुद्धातील 1945ची डिलीमा यांची मिलिटरी बीएसए तसेच 1958च्या लॅम्ब्रेटाचे मालक भिंगार्डे यांच्यासह वेगवेगळे दुचाकीस्वार यामध्ये सहभागी झाले होते.
9 / 10
मानपाडा चौक, ब्रह्मांडपासून तुळशीधाम ते वर्तकनगर मार्गे पुन्हा रेमंड कंपनी असा २१ किलोमीटरचा प्रवास या विंटेज कार आणि दुचाकींनी केला.
10 / 10
खास ठाणेकरांना पाहण्यासाठी या पुरातन वाहनांचे पोखरण रोड क्रमांक दोन येथील रेमंड कंपनीतील ट्रेड शो हॉलमध्ये २० ते २२ फेब्रुवारीपर्यंत मोफत प्रदर्शन ठेवण्यात आले होते. रविवारी कार रॅलीने या प्रदर्शनाची सांगता झाली.