शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'शाओमी'नं आणलं मुलांसाठी स्कूटर, जाणून घ्या खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 2:31 PM

1 / 5
स्वस्त स्मार्टफोन बनवणाऱ्या शाओमी कंपनीने आता मुलांसाठी एक पोर्टेबल स्कूटर बाजारात आणली आहे. या स्कूटरची किंमत जवळपास 2500 रुपये इतकी आहे.
2 / 5
या पोर्टेबल स्कूटरचे नाव Xiaomi 700Kids आहे. ही स्कूटर 5- फोल्ड सेफ्टी डिझाईन आणि 3 स्पीड अॅडजेस्टमेंटसोबत आहे. तसेच, स्कूटरला वाइड ट्रॅक डिझाइन देण्यात आली आहे.
3 / 5
स्कूटरला फ्रंटला दिलेल्या दोन व्हिल्सच्यामध्ये 24 सेंटिमीटरचे अंतर आहे. त्यामुळे स्लायडिंग दरम्यान जास्त स्टेबल करता येते. त्यामुळे स्कूटर चालवताना मुले पडण्याची भीती वाटणार नाही. तसेच, या स्कूटरचे व्हिल्स ग्रिप पकडणारे आहेत.
4 / 5
शाओमीने या पोर्टेबल स्कूटरचे व्हील्स खास बनवले असून याचे डायमीटर (व्यास) मोठे आहे. त्यामुळे स्कूटरवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल.
5 / 5
या पोर्टेबल स्कूटरवर वजन क्षमता 50 किलो इतकी आहे. यामध्ये आरामदायक फूटरेस्ट आहे.
टॅग्स :scooterस्कूटर, मोपेड